वाटंबरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात.
वाटंबरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात.
.वाटंबरे /प्रतिनिधी : सांगोला तालुका वाटंबरे येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भीम नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली या वेळी नूतन सरपंच नामदेव पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, गौतम बुद्धाच्या प्रतिमेचे पूजन माजी ग्रामपंचायत उपसरपंच सुब्राव पवार यांच्या हस्ते करण्यात आले ,ध्वजवंदन माजी सरपंच नामदेव गेजगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य , गावातील विविध मान्यवर, विविध संस्था चे पदाधिकारी तसेच सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष रोहीत चंदनशिवे , उपाध्यक्ष, सचिव सर्व पदाधिकारी व मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक, महिला वर्ग वाटंबरे ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता . ग्रामपंचायत कार्यालय वाटंबरे ,श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच विविध संस्थेमध्ये यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंडळाच्या वतीने या वेळी नुतन सरपंच नामदेव पवार यांचा सत्कार करण्यात आला.
चौकट: माजी पंचायत समिती सदस्य बिरा गेजगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज वाटंबरे , ग्रामपंचायत कार्यालय , सिद्धनाथ वाचनालय तसेच सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाला संविधानाचे पुस्तक भेट दिले त्यांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.




No comments