आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त लक्ष्मी कारंडे यांचा हणमंत नाना मित्रपरिवार यांच्या वतीने सत्कार .
सांगोला तालुका वाटंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षिका लक्ष्मी कारंडे यांना बनकरवाडी येथील क्रांतीज्योती महिला नागरी सह पतसंस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महिला दिनानिमित्त दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचे औचित्य साधत वाटंबरे येथील हणमंत नाना मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांचा यलमार मंगेवाडी येथे कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवक सुरेखा पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पवारवाडी शाळेतील विद्यार्थी स्वानंद याचा वाढदिवस असल्याने त्याचाही शाळेमध्ये पालकांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
या सत्कार समारंभ प्रसंगी विजयदादा पवार, मल्हारी पवार ,प्रतिक पवार माजी ग्रामपंचायत सदस्य खंडू पवार, उमेश गायकवाड ,शिक्षक वर्ग तसेच हणमंतनाना मित्र परिवारातील सदस्य मोठ्या प्रमाणावर यावेळी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा