*कोळेकर महास्वामीच्या नूतन मठाचे व सभागृहाचे दिघंची येथे उद्घाटन*
नाझरे प्रतिनिधी
रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने दिघंची तालुका आटपाडी येथे महास्वामीच्या मठाचे, सभागृहाचे व व्यापारी संकुलाचे बुधवार 27 मार्च रोजी कोळेकर महास्वामींच्या अमृत हस्ते उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे वीरशैव लिंगायत समाज दिघंची व मठ संस्थान तर्फे सांगण्यात आले.
मंगळवार 26 मार्च रोजी होम हवन, पूजा तसेच दुपारी चार वाजता लिंग, नंदी यांची मिरवणूक गावातून निघणार आहे. सायंकाळी आठ वाजता शिवभक्त बालाजी पाटील यांचे कीर्तन तर बुधवार 27 मार्च रोजी मूर्तीची प्रतिष्ठापना, महाआरती व दुपारी एक वाजता महाप्रसाद वाटप होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महादेव महाराज, सेवा सदन हॉस्पिटल मिरजचे प्रमुख डॉ. रविकांत पाटील तासगाव अर्बन बँकेचे चेअरमन महेश हिंगमिरे, दिघंची सरपंच माधुरी मोरे, व शिव कीर्तनकार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवराज नावंदे गुरुजी हे हजर राहणार आहेत. यावेळी पुरोहित म्हणून चिदानंद शास्त्री, वीरेश शास्त्री, योगेश स्वामी, विजयानंद स्वामी हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व समाज बांधवांनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आव्हान कोळेकर महाराज मठ संस्थान दिघंची तर्फे करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा