Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, २३ मार्च, २०२४

झेप फाउंडेशन चे जामखेड तालुका अध्यक्ष सुभाष जायभाय यांच्या सुनबाई कविता संकेत जायभाय यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवीत साजरा.

 झेप फाउंडेशन  चे जामखेड तालुका अध्यक्ष सुभाष जायभाय यांच्या सुनबाई कविता संकेत जायभाय यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवीत साजरा.



 पुणे/प्रतिनिधी 

: झेप फाउंडेशनचे जामखेड तालुका अध्यक्ष सुभाष जायभाय यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत आपल्या सुनबाई कविता संकेत जायभाय यांच्या वाढदिवस हा सामाजिक उपक्रम राबवीत साजरा केला गेला  त्यांनी कात्रज वाघजाई नगर येथील गुरु छाया वृद्धाश्रम मधील आजी-आजोबाना केळी, फरसाणा , वेफर्स वाटप केले


.

जायभाय कुटुंबातील सुभाष जायभाय ,जायभाय काकु, संकेत, कविता जायभाय व झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष कांता (भाऊ) राठोड, शिवाजी मुसळे संस्थापक सचिव, गुरु छाया वृद्धाश्रमाच्या अध्यक्ष अंजली दरवेश मॅडम व त्यांचा मुलगा वरद दरवेश ,साई मुसळे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


सुभाष जायभाय यांनी लोकांच्या समोर एक नवीन आदर्श घालून दिलेला आहे मुलाचा ज्याप्रमाणे वाढदिवस साजरा केला जातो त्याचप्रमाणे मुलीचा व सुनेचा सुद्धा वाढदिवस साजरा करावा सुनेलाच मुलगी समजावे,त्याप्रमाणे वागवावे व स्वतःची मुलगी समजावे.


वृद्धाश्रमातील आजी आजोबा यांच्या सोबत वाढदिवस साजरा करून थोडासा वेळ त्यांच्याबरोबर घालवला व त्यांची आपुलकीने विचारपूस केली व गप्पा गोष्टी करत त्यांच्याकडून वाढदिवसानिमित्त आशीर्वाद घेतला.

आज काल वाढदिवसा वरती खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो हा पैसा जर योग्य व्यक्तींना, गोरगरिबांना अनाथाश्रमांना, अन्नदान , कपडे ,औषधे, गरजेच्या वस्तू वाटप करून जर साजरा केला तर बरेचसे चांगले होईल व लोकांच्या बऱ्याच गरजा भागतील म्हणूनच म्हणलं जातं अन्नदान श्रेष्ठदान.


गुरु छाया वृद्धाश्रमच्या अध्यक्ष अंजली दरवेश मॅडम यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल जायभाय कुटुंब व झेप फाउंडेशन  त्यांचे आभारी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart