वाटंबरे येथे बंधाऱ्याचे भुमिपुजन.
वाटंबरे /प्रतिनिधी: बऱ्याच वर्षापासून या भागातील शेतकऱ्यांची बंधाऱ्याची मागणी होती ती आज मागणी पूर्ण झालेली आहे, या बंधाऱ्यामुळे शेतीचा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे तसेच या भागातील शंभर टक्के क्षेत्र ओलिताखाली येणार आहे माजी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत पवार हे बंधाऱ्याच्या भुमीपुजन सोहळ्या प्रसंगी बोलत होते .
सांगोला तालुका वाटंबरे येथे जलसंधारन विभागातून मंजूर झालेल्या बंधार्याचे पाटोळे मळ्याशेजारी असणाऱ्या ओढ्यावर शनिवारी दि. २ मार्च रोजी भुमीपुजन सोहळा संपन्न झाला.
या बंधाऱ्याचे भुमीपुजन बाजूच्या शेतकऱी बांधवांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वाटंबरे ग्रामपंचायत सरपंच किरण पवार , नामदेव पवार, सूर्यकांत पवार, सुब्राव पवार ,खंडू पवार, नामदेव पवार ,महादेव पवार, मधुकर पवार, प्रतिक पवार, आशीप मुलानी ,संजय पवार, बाबू पवार , चव्हाण गुरुजी, धीरज पवार, भाग्यवान पवार, अरुण पवार तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग वाटंबरे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟦🟦🟦🟦🟦🟦


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा