सन्मान हा माझा नसून संपूर्ण गावाचा आहे : राष्ट्रपती पदक विजेते वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर.
सन्मान हा माझा नसून संपूर्ण गावाचा आहे : राष्ट्रपती पदक विजेते वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर.
नाझरे प्रतिनिधी
चोपडी तालुका सांगोला गावातर्फे माझा राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने सत्कार होत आहे व यामध्ये माझे चुलते माजी मुख्याध्यापक वाय एस बाबर, आई वडील, पत्नी, मित्र कंपनी, मित्र कंपनी, गुरुजन तांबोळी सर व सर्व गावाचे योगदान मोठे असून, मी कधीही विसरणार नाही व सत्कारामुळे ऊर्जा व प्रेरणा मिळाली यापुढेही आपण अधिक पोलीस दलातील कामकाज जोराने व चांगले करू व त्यामुळे हा माझा सन्मान नसून संपूर्ण गावाचा आहे असे मी समजतो असे मत राष्ट्रपती पदक विजेते सत्कारमूर्ती वसंतराव बाबर यांनी सत्कार प्रसंगी बाळासाहेब देसाई विद्यालय चोपडी येथे व्यक्त केले.
गुन्हेगारांनी पोलीस स्टेशन कडे तिरक्या नजरेने बघितले नाही पाहिजे अशा पद्धतीने कामकाज करणे गरजेचे आहे व यापुढेही सर्वसामान्यांचे प्रश्न, अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण मदत करू व माझ्या जडणघडणीत सर्व गावाचे योगदान आहे असेही यावेळी बाबर यांनी सांगितले. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. व साहेबांची गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रास्ताविक गणेश बाबर साहेब यांनी केले व लायब्ररी साठी प्रयत्न करू असे सांगितले. तसेच मानपत्र वाचन शिक्षक सुनील जंवजाळ यांनी केले.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत गावाचे नाव तात्या मुळे झाले व यामागे आई-वडील, चुलते यांचे कष्ट आहे असे मत माजी उपसरपंच ज्ञानेश्वर बाबर यांनी व्यक्त केले. तर पुरस्कार मलाच मिळाला आहे व त्यामुळे माझे मन भरून आले व तात्याच्या जडणघडणीत वायस बाबर सरांचा मोठा वाटा आहे असे मत प्रा. प्रकाश केंगार यांनी व्यक्त केले. तर तात्याचा स्वभाव ज्यादा बोलणारा नाही परंतु ज्यादा काम करणार आहे व तात्याच्या शिक्षणात वायस बाबर सरांचा मोठा वाटा आहे व 14 ते 16 तास अभ्यास करून तात्यांनी यश संपादन केले व आज राष्ट्रपती पदकापर्यंत पोहोचले यामध्ये सौ. सारिका वहिनींचा सिंहाचा वाटा आहे व मित्र असावा तर तात्या सारखा असावा तसेच खऱ्या अर्थाने ते आज चोपडी भूषण आहेत असे मत शिक्षक नेते पतंगराव बाबर यांनी व्यक्त केले. चोपडी सारख्या ग्रामीण भागातील माणूस पोलीस दलातून राष्ट्रपती पदकापर्यंत पोहोचतो ही अभिमानाची गोष्ट आहे असे मत डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागाची नाळ आज साहेबांनी जपली व गावाचे नाव उंचावले अशा या सुपुत्र चा सन्मान म्हणजे गावाचा सन्मान आहे व त्यामुळे ते राष्ट्रपती पदकापर्यंत पोहोचले असे मत शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुरेश राव पवार यांनी व्यक्त केले. यावेळी सोसायटी चेअरमन भिकाजी बाबर, माजी मुख्याध्यापक वाय एस बाबर, कार्यक्रमाचे अध्यक्ष तांबोळी सर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सहाय्यक कृषी अधीक्षक निवड झाल्याबद्दल समाधान बाबर यांचाही तात्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी सरपंच सौ मंगल ताई सरगर, उपसरपंच पोपट शेठ यादव, जि प सदस्य दादासो बाबर, बाळासाहेब देसाई हायस्कूलचे अध्यक्ष आनंदराव बाबर, तात्यांचे आई वडील, पत्नी, सर्व परिवार तसेच मुख्याध्यापक के.डी. बाबर व सर्व स्टाफ, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध गावचे लोकप्रतिनिधी, शिक्षक, नागरिक, युवक, महिला, उद्योजक, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक सुनील जवंजाळ यांनी तर आभार शिक्षक जनार्दन बाबर यांनी मानले.


No comments