अनावश्यक खर्चाला फाटा देत वृक्षारोपण करत केला वाढदिवस साजरा.
वाटंबरे / प्रतिनिधी : सांगोला तालुका वाटंबरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य खंडू मुरलीधर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराने अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यांचा वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा केला.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक धनंजय पवार, माजी सरपंच प्रवीण पवार ,झेप फाउंडेशन चे सोलापूर जिल्ह्याचे सचिव पत्रकार दत्तात्रय पवार , शिवबाराजे पतसंस्थेचे चेअरमन भाग्यवान पवार, महादीप उद्योग समुहाचे संस्थापक दिगंबर साळुंखे सर ,ईकबाल पटेल, पत्रकार नंदकुमार गायकवाड, अविनाश पाटोळे उपस्थित होते.

No comments