सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचा यशस्वी उद्योजक पुरस्काराने सुरेश पवार सन्मानित.
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचा यशस्वी उद्योजक पुरस्काराने सुरेश पवार सन्मानित.
अहमदनगर येथे सरपंच सेवा संघ यांचा राज्यस्तरीय विविध क्षेत्रातील पुरस्कार सोहळा रविवारी ११ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला . यावेळी वाटंबरे येथील यशराज गांडूळ खत प्रकल्प उद्योजक सुरेश पवार याना सेंद्रिय शेती, गांडूळ खत निर्मिती आणि कृषी क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सरपंच सेवा संघ यांच्याकडून दिला जाणारा यशस्वी उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदरचा पुरस्कार हा त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे , हीवरे गावचे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, समाजसेवक यादवराव पावशे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . यापूर्वी त्यांना महाराष्ट्र राज्य आदर्श उद्योजक स्वर्गीय वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्कार ,महात्मा फुले कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .सुरेश पवार यांनी वाटंबरे येथे सुरू केलेल्या यशराज गांडूळ प्रकल्पाच्या माध्यमातून सेंद्रिय खताचा व्यवसाय सुरू केला त्यांनी अल्पभूधारक शेतकरी ते गांडूळ खत उत्पादक असा कमी कालावधीमध्ये यशस्वी प्रवास केला आहे त्यांनी राज गांडूळ खत प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी तसेच विविध महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन केले आहे त्यांनी बनवलेल्या गांडूळ खताला वर्मी वॉशला महाराष्ट्र, कर्नाटक मध्य प्रदेश, येथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यांच्या सामाजिक कार्यातील मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत वाटंबरे येथील शरद पवार ,संजय पवार,बलभीम पवार, अनील सुर्यवंशी, आण्णासाहेब वाघ उपस्थित होते .


No comments