Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

केंद्रशाळा वाटंबरेचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात व आनंदात संपन्न.

 केंद्रशाळा वाटंबरेचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात व आनंदात संपन्न.





स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो ,त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वास आकार येतो असे ग्रामीण साहित्यिक कवी शिवाजी बंडगर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे येथील स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना संबोधित करीत असताना  उद्गार  काढले.



   त्यानंतर झालेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत, कोळीगीत,लावणी, चित्रपट गीते यावर एकापेक्षा एक सरस नृत्ये, तसेच नाटके व गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.गीतगायनास हार्मोनियम साथ देणार्या शाळेतील शिक्षक श्री पांडुरंग कोकरे सर यांनी 'उमगाया बाप रं 'हे गीत सादर करून उपस्थितांना भारावून टाकले.




    जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे शाळेचे शनिवार १० फेब्रुवारी स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण साहित्यिक कवी शिवाजी बंडगर हे उपस्थित होते .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार व काझी सर होते .




     या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी बंडगर व इतर मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन  करून करण्यात आले तसेच आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव हनमंत पवार सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे यांनी गाजराची पुंगी व आमच्या सासुबाईंचं असंच असतं या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.




    या पारितोषिक वितरणामध्ये आदर्श विद्यार्थी ,गुणवंत विद्यार्थी ,निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच तालुकास्तरीय, बीट स्तरीय गायन व खोखो स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते  ट्रॉफी ,पारितोषिक व शालेय साहित्य देण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष भाग्यवान पवार, नूतन उपाध्यक्ष दिगंबर साळुंखे,प्रज्ञा चंदनशिवे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला .तसेच शाळेचे माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पवार यांची झेप फाउंडेशनच्या सोलापूर जिल्हा सचिव पदी निवड झाली असल्याने त्यांचाही सत्कार यावेळी शाळेच्या वतीने करण्यात आला . 




   शाळेतील गोळाफेक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणारा शाळेतील विद्यार्थी राजवीर दत्तात्रय मासाळ याचा सत्कार व शाळेस आदर्श शाळा पुरस्कार व आदर्श विद्यार्थी पुरस्कार वैष्णवी फाउंडेशन य.मंगेवाडी यांचेकडून देण्यात आले.तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॅफ्या शैक्षणिक साहित्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाग्यवान पवार, विजयदादा पवार, दत्तात्रय पवार यांनी दिले.






     कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय पवार यांनी केले सूत्रसंचालन मासाळ गुरुजी यांनी केले. स्नेहसंमेलन पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य नामदेव पवार ,केंद्रप्रमुख काझी, सोसायटी चेअरमन नाना बापू पवार ,माजी ग्रामपंचायत सदस्य सुब्राव पवार, तालुका नियोजन समिती सदस्य विजय पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक धनंजय पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य खंडू पवार, माजी सरपंच नामदेव पवार, एज्युकेशन आटपाडीचे सचिव हनमंत पवार सर, आसिप मुलानी ,नारायण कुठे, दत्तात्रय मासाळ,  दिग्विजय पवार, बजरंग मासाळ उपस्थित होते.


    या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पांडुरंग कोकरे गुरुजी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा मिसाळ ,तेली मॅडम यांनी विशेष असे परिश्रम घेतले.

No comments