Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

केदार हॉस्पिटलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर पंधरवडा.

केदार हॉस्पिटलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर पंधरवडा.

वैद्यकीय क्षेत्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेले व शिबिराच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये आपला वेगळा ठसा उमटविलेले सांगोला येथील डॉ. निरंजन केदार यांच्या वासुद रोड दत्तनगर जवळ असणाऱ्या केदार हॉस्पिटल येथे हॉस्पिटल च्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त  मोफत आरोग्य तपासणी शिबीर पंधरवडा याचे आयोजन केले आहे. दि. १५ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदरच्या शिबिरामध्ये
स्त्रीरोग-प्रसूतीशास्त्रतज्ञ ,मेडिसिन-
आय.सी.यु. तज्ञ, मूत्ररोग तज्ञ डॉक्टर उपलब्ध राहणार असून तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत स्त्रीरोग, हृदयरोग-उच्चरक्तदाब,मूत्ररोग निदान तपासणी  शिबिर पार पडणार आहे.मोफत स्त्रीरोग तपासणी डॉ.दिव्यता केदार (एम.एस. स्त्रीरोग-प्रसूती शास्त्रतज्ञ ) यांचे मार्फत स्त्रीयांचे सर्व प्रकारचे आजार ,मासिक पाळीचे आजार,गरोदर स्त्री तपासणी, स्त्री-पुरुष वंध्यत्व,गर्भाशय पिशवीचे आजार इ.आजारांवर तपासणी होणार आहे तसेच मोफत ह्रदय रोग-उच्च रक्तदाब तपासणी व  मोफत मूत्ररोग तपासणी   डॉ निरंजन केदार (एम.डी.मेडिसिन ) आणि मूत्ररोग तज्ञ डॉक्टर यांचे मार्फत हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह,दमा, थायरॉईड, श्वसनाचे आजार,पोटाचे आजार,मेंदूरोग ,मूत्ररोग,मुतखडा,
प्रोस्टेट ग्रंथीची सूज,मूत्राशयाचे आजार ,किडनीचे आजार,किडनीतील खडे,मूत्रवाहिनी मधील खडे,
मूत्राशयातील खडे ,मूत्रमार्गातील खडे ,अन्य मूत्रविकार इ.या सर्व आजारांवर मोफत निदान यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे.केदार लॅबोरेटरी यांचे मार्फत मोफत हृदयाची तपासणी-इ. सी. जी.,मोफत रक्त तपासणी-सी.बी. सी. रक्तातील हिमोग्लोबिन, साखर, रक्तगट तपासणी केली जाणार आहे.तरी सांगोला तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व गोर-गरीब गरजू रुग्णांनी दिनांक १५ डिसेंबर ते ३० डिसेंबर या पंधरवड्यात खालील फोनवरती संपर्क साधून या शिबिराचा लाभ घ्यावा.संपर्क- 9145124579,8010551108

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart