Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

महावितरण शाखा कार्यालय नाझरे यांच्याहस्ते हातीद महावितरण उपविभागीय कार्यालयातील नूतन अधिकाऱ्यांचा सत्कार

 महावितरण शाखा कार्यालय नाझरे यांच्याहस्ते हातीद महावितरण उपविभागीय कार्यालयातील नूतन अधिकाऱ्यांचा सत्कार.



वाटंबरे /प्रतिनिधी : सांगोला तालुका हातीद येथे महावितरण कंपनीने नव्याने लोकांच्या सेवेसाठी नुतन उपविभागीय कार्यालय चालू केले आहे. या कार्यालयामुळे सांगोला तालुक्यातील घेरडी,जवळा, नाझरे,कोळा या विभागातील नागरीकांचे विजेच्या संबंधित असणारे प्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार आहे .तसेच या नूतन उपविभागीय कार्यालयामुळे सांगोला येथील उपविभागीय कार्यालयावरील ताण कमी होण्यास मदत


होणार आहे . या उपविभागीय कार्यालयात विविध जागेवरती नूतन अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. उपकार्यकारी अभियंता पदी मा. हणमंत बनसोडे , गुणवत्ता विभाग पदी सहाय्यक अभियंता अमित शिंदे , ऑफिस कनिष्ठ अभियंता पदी 

 यशवंत दिघे व बिलिंग विभागामध्ये सहाय्यक लेखापाल पदी शिवाजी जाधव , मानव संसाधन विभाग पदी प्रवीण कट्टी , शिपाई पदी अनिकेत घोगरे यांची नियुक्ती केली गेली आहे. या सर्वांचा सत्कार सोहळा महावितरण शाखा कार्यालय नाझरे यांच्यावतीने दि.७ सप्टेंबर शुक्रवारी आयोजित केला होता. नाझरे शाखा कार्यालयाचे शाखाप्रमुख मुळीक तसेच शाखा कार्यालय मधील सर्व यंत्रचालक बंधू, जनमित्र व बाह्य स्रोत कर्मचारी हे सर्व सत्कार सोहळ्यास उपस्थित होते. 


 यावेळी उपविभागीय अभियंता हणमंत बनसोडे यांनी नाझरे कार्यालय येथील अभियंता व सर्व कर्मचारी यांनी केलेल्या सत्कार सोहळा बद्दल त्यांचे आभार मानले.

No comments