Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

महूद गावचे मारुतीराव येडगे "महाराष्ट्राचे अनमोल रत्न "या पुरस्काराने सन्मानित.

महूद गावचे मारुतीराव येडगे "महाराष्ट्राचे अनमोल रत्न "या पुरस्काराने सन्मानित.



   वाटंबरे /प्रतिनिधी : महूद गावचे सुपुत्र व मायभूमी रिॲलिटी ग्रुप पुणे यांचे सीईओ मारुतीराव दिगंबर येडगे यांना "महाराष्ट्राचे अनमोल रत्न" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार  राज्याचे उद्योग मंत्री मा. उदय सामंत यांचा हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला.


  लँड डेव्हलपमेंट, मॅनेजमेंट यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली यासाठी त्यांना  एबीपी माझा या वृत्तवाहिनी कडून पुरस्कार प्रदान करण्यात आला .
   ग्रामीण भागातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन उद्योग व्यवसायामध्ये उंच भरारी घेणाऱ्या मारुतीराव येडगे यांनी  सांगोला तालुक्याच्या शिरपेचात  मानाचा तुरा रोवला आहे.  सांगोला तालुका व महुद  परिसरामध्ये त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart