माणगंगा नदी संवाद यात्रेचे वाटंबरे येथे जंगी स्वागत
*माणगंगा नदी संवाद यात्रेचे वाटंबरे येथे जंगी स्वागत*
{भारतीय संस्कृतीत नदीला महत्वाचे स्थान आहे : कृषी अधिकारी शिवाजी शिंदे }
वाटंबरे/प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना विविध कार्यक्रमांचे नियोजन चालू केले आहे त्या अंतर्गत सांगोला तालुक्यामध्ये 'चला जाणूया नदीला' मोहिमेमध्ये "माणगंगा" नदी संवाद यात्रा मोहिमेची सुरुवात केलेली आहे दि. २६ डिसेंबर २०२२ पासून सुरु झालेली ही संवाद मोहीम यात्रा आज मंगळवार दि. २७ डिसेंबर २०२२ रोजी वाटंबरे येथे पोहचली. वाटंबरे येथे या सवांद यात्रेचे मोट्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी गावाचे सरपंच किरण पवार उपसरपंच मोनिका निकम तसेच ग्रामसेवक एस,आर, मोहिते , ग्रामस्थ व विध्यार्थी मोठ्या प्रमाणावर या वेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गावामध्ये जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढली. माणगंगा नदी संवाद यात्रेसाठी उपस्थित असलेले सर्व प्रशासकीय अधिकारी, मानगंगा समन्वयक वाटंबरे ग्रामस्थ ,विद्यार्थी यांनी माण नदी पात्रात जाऊन कलशाचे पूजन व आरती करण्यात केली. यात्रेतील अधिकारी व ग्रामस्थ यांचा संवाद साधण्याची व्यवस्था गावातील खंडोबा मंदिरात करण्यात आली होती.
या कार्यक्रमा प्रसंगी कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, प्रभारी गट विकास अधिकारी काळुंगें , बी. डी. ओ . लोकरे , शाखा अभियंता तबाळे, सर्कल पोलके, तलाठी बाळासाहेब शिंदे, सांगोला महाविद्यालयाचे स. प्राद्यापक डॉ. अमोल पवार व प्रा. विकास उबाळे तसेच संवाद यात्रेचे समन्वयक वैजनाथ (काका) घोंगडे व प्रकाश सोळसे प्रामुख्याने उपस्थित होते.
संवाद यात्रेचे समन्वयक वैजनाथ (काका) घोंगडे यांनी ग्रामस्थांचे प्रबोधन करताना असे सांगितले कि, नदीचे स्वास्थ्य राखण्याची जबाबदारी जशी शासनाची, प्रशासनाची आहे तशी नदी काठाच्या ग्रामस्थांची आहे. प्रमुख उपस्थित असणाऱ्या शिवाजी शिंदे (कृषी अधिकारी) नदीचे महत्व म्हणजे आपली संस्कृती त्याचबरोबर आपण सर्वजण त्या वाहिनी वरती अवलंबून आहोत ती वाहिनी जर बंद पडली तर आपलं जीवनही बंद पडेल असा कडक शब्दांमध्ये अतिक्रमण वाल्यांचा समाचार घेतला. प्रभारी गट विकास अधिकारी काळुंगें यांनी मान्यवरांचे आभार मानले की त्यांनी ग्रामस्तांमध्ये नदीविषयी जनजागृती केली. संवाद यात्रेचे अवचित्य सोडून श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल वाटंबरे येथे नदीवर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विध्यार्थ्यांना स्पर्धेच्या बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी गावातील आजी माझी ग्रामपंचायत सदस्य, विविध सोसायटीचे चेअरमन इतर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







No comments