Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

राजुरी गावांमध्ये प्रथम भरलेल्या आठवडी बाजारास उत्स्फूर्त प्रतिसाद

 राजुरी गावांमध्ये प्रथम भरलेल्या आठवडी बाजारास उत्स्फूर्त प्रतिसाद

 {राजुरी ग्रामस्थांचे स्वप्न अखेर पूर्ण}



 सांगोला तालुक्याच्या टोकावरती असणाऱ्या  राजुरी  गावामध्ये  सोमवार दिनांक २६ डिसेंबर रोजी राजुरी येथे जुनी ग्रामपंचायत  कट्ट्यासमोर आठवडी बाजार भरवण्यात आला होता  या आठवडी बाजारामध्ये  भाजीपाला, बेकरी पदार्थ, मिठाईचे दुकान, स्टेशनरीचे दुकान, कपड्याचे दुकान, यांच्यासह  अनेक वस्तूचे  स्टॉल लावण्यात आले होते तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी शुद्धा आपल्या शेतातील भाजीपाला विक्रीला आणला होता  प्रथमच भरलेल्या आठवडी बाजार साठी आलेल्या आलेल्या  सर्व व्यापाऱ्यांचे  व शेतकऱ्यांचे राजुरी ग्रामस्थ व ग्रामपंचायत राजुरी यांच्या वतीने  फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले  आठवडा बाजार भरावा अशी ग्रामस्थांच्या अनेक दिवसांची मागणी होती  त्यावर राजुरी  ग्रामपंचायतीने व युवानेते दादासाहेब व्हळगळ यांच्या संकल्पनेतून विविध व्यापाऱ्यांना आवाहन करून राजुरी गावांमध्ये आठवडी  बाजारासाठी येण्याचे  निमंत्रण देण्यात आले होते या निमंत्रणाचा  स्वीकार करून  विविध प्रकारच्या व्यापाऱ्याने आपल्या वस्तू सह  राजुरी गावामध्ये विक्रीसाठी स्टॉल लावले होते  राजुरी मध्ये प्रथमच बाजार भरत असल्याने  नागरिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद होता  तसेच इतरत्र न जाता  सर्व प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळाल्यामुळे राजुरी ग्रामस्थांच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला आहे   विक्रीसाठी आलेल्या व्यापाऱ्याकडून व शेतकऱ्याकडून  कोणत्याही प्रकारचा कर अथवा शुल्क आकारला नाही  यापुढे  ही विविध व्यापाऱ्याने  व शेतकऱ्यांनी  आपल्या वस्तू प्रत्येक सोमवारी राजूरी येथील आठवडी बाजारामध्ये  विक्रीसाठी  आणाव्यात असे आवाहन  सरपंच सौ प्रतिभा व्हळगळ यांनी केले आहे.


 हा बाजार यशस्वी करण्यासाठी  सरपंच सौ प्रतिभा व्हळगळ,  युवा नेते दादासाहेब व्हळगळ,उपसरपंच मोहिनी काटे,बाजार कमिटीचे अध्यक्ष सुखलाल बंडगर, उपाध्यक्ष महावीर काटे, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब जुजारे, पोलीस पाटील विजयकुमार वाघमारे  वि का स सेवा सोसायटीचे चेअरमन पांडुरंग दबडे, तुकाराम सुरवसे  आप्पासाहेब व्हळगळ , गुलाब मोरे,गौतम चव्हाण, विष्णू दबडे दिलीप दबडे, तानाजी बंडगर, बाळासाहेब बिसले, भारत काटे, बाळासाहेब काटे गुरुजी, औदुंबर सुतार, सचिन वाघमारे,दत्ता खुळे, सुखदेव खुळे, रामचंद्र माने, दगडू खुळे, काकासाहेब जुजारे,मच्छिंद्र बंडगर, तानाजी चौंडे,  (ग्रा पं सदस्य )धनाजी चौंडे, संतोष बंडगर , सत्यजित काटे,(ग्रा पं सदस्य )काकासाहेब दबडे, सलीम पटेल,समाधान बंडगर,महेश काटे, अमित बिचकुले रमेश दबडे,यांनी परिश्रम घेतले,


No comments