जलिंगवाडी अंगणवाडी ( रानमळा चोपडी) शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार कौतुकास्पद: सेवानिवृत्त सुभेदार अमोल बाबर
शनिवार, ११ एप्रिल, २०२६
भो जलिंगवाडी अंगणवाडी ( रानमळा चोपडी) शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार कौतुकास्पद: सेवानिवृत्त सुभेदार अमोल बाबर
जलिंगवाडी अंगणवाडी ( रानमळा चोपडी) शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार कौतुकास्पद: सेवानिवृत्त सुभेदार अमोल बाबर
शुक्रवार, १० एप्रिल, २०२६
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नलवडेवाडी येथे भव्य "कलाविष्कार 2026" कार्यक्रमाचे आयोजन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नलवडेवाडी येथे भव्य "कलाविष्कार 2026" कार्यक्रमाचे आयोजन.
सांगोला :जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नलवडेवाडी केंद्र उदनवाडी ता. सांगोला यांच्या भव्य पटांगणावर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य "कलाविष्कार 2026 कार्यक्रम" रविवार दि. 12/04/2026 रोजी सायंकाळी 07:00 वा.आयोजित करण्यात आला आहे. तरी या स्नेहसंमेलनाच्या आनंदोत्सवात सहभागी होऊन पुन्हा एकदा बालपणात जाऊया व कार्यक्रमाची शोभा वाढवूया.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्री.चेतनसिंह केदार सावंत(सभापती, आरोग्य व शिक्षण जि. प. सोलापूर) हे उपस्थित राहणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ. पूनम इंगवले (सभापती, पं.स. सांगोला) मा. श्री.अजय सरगर (उपसभापती पंचायत समिती सांगोला)मा. श्री. सुयोगजी नवले सो (गटशिक्षणाधिकारी, पं.स. सांगोला) तर प्रमुख उपस्थिती मा. सौ. संगीता संजय भोसले (सरपंच, ग्रा.पं. पाचेगाव खुर्द) मा. श्री. हणमंत तुकाराम मिसाळ (उपसरपंच ग्रा.पं. पाचेगाव खुर्द) माःश्री अमोल भंडारीसो. (शिक्षण विस्तार अधिकारी बीट कोळे) मा. श्री दिनकर गाडे केंद्रप्रमुख केंद्र उदनवाडी उपस्थित असणार आहेत. तसेच तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी व बहुसंख्य शिक्षक ही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रक सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत पाचेगाव खुर्द, मा. अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती जि. प. प्राथमिक शाळा नलवडेवाडी (पाचेगाव खुर्द), मा.मुख्याध्यापक, शिक्षक वृंद सर्व पालक जि.प.प्रा शाळा नलवडेवाडी (पाचेगाव खुर्द), अंगणवाडी सेविका, मदतनीसताई नलवडेवाडी (पाचेगाव खुर्द), समस्त ग्रामस्थ नलवडेवाडी ता. सांगोला हे आहेत. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे विविध कला सादरीकरण पाहण्याची सुंदर संधी आपणास मिळणार आहे. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये भव्य मोठा सुंदर शामियाना व निसर्गरम्य वातावरण , जुन्या हिंदी-मराठी गीतांची रेलचेल, उत्तम साउंड सिस्टम, डेकोरेशन, लाईट व्यवस्था,सर्वांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था तरी सर्व पालक, ग्रामस्थ, शेजारी, मित्रमंडळी, नातेवाईक, शाळाप्रेमी व शिक्षणप्रेमी यांनी सहकुटुंब उपस्थित राहावे ही नम्र विनंती. चला, आपल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊया.
डिजिटल मीडियाच्या गोव्यातील राष्ट्रीय अधिवेशनासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रण*
सोमवार, ६ एप्रिल, २०२६
अजनाळे येथे अमानवीय कृत्य ,मतिमंद महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपी विजय कोळवले विरुद्ध गुन्हा दाखल
अजनाळे येथे अमानवीय कृत्य ,मतिमंद महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपी विजय कोळवले विरुद्ध गुन्हा दाखल
सांगोला ;सांगोला तालुक्यातील अजनाळे गावात घडलेल्या संतापजनक प्रकाराने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मानसिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या एका महिलेशी अत्यंत निर्लज्जपणे गैरवर्तन करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
दि. ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास विजय विठ्ठल कोळवले या व्यक्तीने पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्या वेळी महिला एकट्याच असल्याची संधी साधत आरोपीने घरात घुसून अमानुष कृत्य केले. स्वतःचे कपडे काढत पीडितेचे कपडे काढून तिच्या लज्जेचा भंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकाराची माहिती शेजारील महिलेच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर फिर्यादीने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पीडितेकडून विचारपूस केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला असून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी आरोपी विजय विठ्ठल कोळवले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७४ व ७६, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत कलम ३(१)(w)(i) तसेच अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ अंतर्गत कलम ९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर अजनाळे गावात संतापाची तीव्र लाट उसळली असून आरोपीवर तात्काळ व कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रविवार, ५ एप्रिल, २०२६
होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटनेच्या नूतन सचिव पदी बिरू भंडगे यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल गेजगे यांची एकमताने निवड
होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटनेच्या नूतन सचिव पदी बिरू भंडगे यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल गेजगे यांची एकमताने निवड
होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटना तालुका सांगोला सदर संघटनेची बैठक दिनांक ५/४/२०२६ रोजी लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर बैठकीत पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली त्यामध्ये सचिव या पदावर मा. श्री. बिरू भंडगे (पाचेगाव खुर्द) यांची तर उपाध्यक्ष पदावर मा.श्री. विठ्ठल गेजगे (वाटंबरे) यांची नियुक्ती करण्यात आली.
या निवडीला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले. या कामे प्रास्ताविक संघटनेचे कार्याध्यक्ष मा.श्री.कुंडलिक भंडगे यांनी केले. संघटनेचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री. मानाप्पा भडंगे , उपाध्यक्ष मा. श्री. विजय ऐवळे (चिंचोली), कार्याध्यक्ष मा.श्री. कुंडलिक भंडगे(अजनाळे), नूतन उपाध्यक्ष मा.श्री. विठ्ठल गेजगे(वाटंबरे), सहसचिव ह.भ.प. केशव हेगडे (सोनलवाडी), सदस्य मा.श्री.धनंजय भडंगे, मा.श्री. नारायण भंडगे आदी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेचे आधारस्तंभ लोकप्रिय आमदार मा. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सदर बैठक उत्साहात पार पडली व संघटनेच्या भावी कार्यास आमदारांनी शुभेच्छा दिल्या. आभार संघटनेचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री. मानाप्पा भडंगे यांनी केले.
सोमवार, ३० मार्च, २०२६
स्व.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मारकाला पालकमंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे यांनी केले अभिवादन
रविवार, २९ मार्च, २०२६
चोपडी -रानमळा येथे ३१ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत श्री. भोजलिंग यात्रा महोत्सवाचे आयोजन.
चोपडी -रानमळा येथे ३१ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत श्री. भोजलिंग यात्रा महोत्सवाचे आयोजन.
सांगोला/ प्रतिनिधी:( दशरथ बाबर): चोपडी (रानमळा) तालुका. सांगोला येथे मंगळवार दिनांक ३१ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत श्री. भोजलिंग यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री भोजलिंग यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रात्री ८ वाजता श्री. संदीप मोहिते महाराज व अतुल हातेकर महाराज यांचा भारुडाची जुगलबंदी कार्यक्रम आयोजित केला आहे.
बुधवार दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजता सासनकाठीची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता महिलांसाठी व पुरुषांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भव्य बक्षिसांचे आयोजन केले आहे. महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला आहे. तर महिला व पुरुषांसाठी रस्सीखेच स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता धावण्याच्या स्पर्धा होणार आहेत .सकाळी ९ वाजता स्लो बाईक स्पर्धा होतील. संध्याकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता सिद्धेश्वर संगीत भजनी भारुड मंडळ दहिवडी यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
शुक्रवार दिनांक ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता भव्य खुला रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धा लहान व मोठ्या गटात आयोजित केलेल्या आहेत. लहान गटासाठी अनुक्रमे ७ हजार रुपये ,५ हजार रुपये, ३ हजार रुपये बक्षिसे देण्यात येणार आहेत . मोठ्या गटासाठी अनुक्रमे २० हजार रुपये,१५ हजार रुपये ७ हजार रुपये, व ५ हजार रुपये असा बक्षीसांचा खजिना देण्यात येणार आहे.यात्रेच्या व कार्यक्रमाच्या संदर्भात अमोल बाबर ९४२०५६१९५५ व राहुल बाबर ९७६३०४०९५८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा . श्री भोजलिंग यात्रा कमिटी चोपडी (रानमळा) व ग्रामस्थ यांनी या यात्रेचे आयोजन केले असून या कार्यक्रमासाठी भाविक- भक्त व स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .














Social Media Icons