Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

जवळा गटात महायुतीचा रणशिंग फुंकला!

 जवळा गटात महायुतीचा रणशिंग फुंकला!

वाढेगाव येथे प्रचाराचा भव्य शुभारंभ; वाढेगावच्या कॉर्नर सभेत जनसागर उसळला



सांगोला प्रतिनिधी:

जवळा गटामधील जिल्हा परिषद व पंचायत समिती महायुतीच्या प्रचाराचा भव्य उद्घाटन सोहळा मौजे वाढेगाव येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या ऐतिहासिक प्रचार शुभारंभाने संपूर्ण जवळा गटात निवडणुकीचे वातावरण अक्षरशः तापले असून महायुतीच्या विजयाचा विश्वास कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आला.

या निमित्ताने जवळा गटाचे जिल्हा परिषद उमेदवार श्री. अतुल (मालक) पवार व पंचायत समितीचे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ वाढेगाव येथे जोरदार कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

जवळा गटामधील जिल्हा परिषद व पंचायत समिती महायुतीच्या प्रचाराचा भव्य उद्घाटन सोहळा मौजे वाढेगाव येथे उत्साहात पार पडला. या प्रचार शुभारंभामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले असून महायुतीच्या विजयाचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला.

या वेळी जवळा गटाचे जिल्हा परिषद उमेदवार श्री. अतुल (मालक) पवार व पंचायत समितीचे उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त वाढेगाव येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उमेदवारांना भरभरून पाठिंबा दिला.


कॉर्नर सभेत उमेदवारांनी विकास, जनतेच्या मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, वीज तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत ठाम भूमिका मांडली. “जवळा गटाचा सर्वांगीण विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून लोकांच्या विश्वासावर आम्ही खरे उतरू,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या सभेला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला असून रस्ते, चौक आणि गल्लीगल्लीतून कार्यकर्त्यांची व समर्थकांची प्रचंड गर्दी जमली होती.

सभेत महायुतीच्या सर्व प्रमुख नेतेमंडळी, पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जवळा गटाचा विकास हाच आमचा अजेंडा असून सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही कायम रस्त्यावर उतरू,” असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.

घड्याळाच्या चिन्हाचा जयघोष, घोषणांनी दुमदुमलेला परिसर आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता, जवळा गटात महायुतीने निवडणूक लढाईत आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत या सभेतून मिळाले. प्रचाराचा हा भव्य शुभारंभ आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

*जि. प.व पं.स.सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी दुसरे प्रशिक्षण हँडसॉन (प्रात्यक्षिक) संपन्न*

 

 *जि. प.व पं.स.सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी दुसरे प्रशिक्षण हँडसॉन (प्रात्यक्षिक) संपन्न*



              सांगोला येथे आज दिनांक 31/01/2026 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह व विद्यामंदिर प्रशाला ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सकाळी 10:00  ते 5:00 वाजेपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व कायद्या च्या चौकटीत पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी सूचना दिल्या आहेत

        तसेच यावेळी सोमनाथ साळुंखे निवासी नायब तहसीलदार, समाधान वाघमोडे सर, यांनी ईव्हीएम बाबत मार्गदर्शन केले सिलिंग प्रोसेस दाखवण्यात आली आहे मॉक पोल, मतदार ओळख प्रक्रिया याबाबत माहिती दिली प्रशिक्षणासाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक, दोन, तीन, व बुथवरील परिचर असे एकूण  1470 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते यावेळी कैलास मडके, शशिकांत सुतकर, नितीन गवळी, नागेश हवेली, सर्व ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव झोनल अधिकारी उपस्थित असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी दिली आहे.    

     





       विद्यामंदिर प्रशाला सांगोला या ठिकाणी हँडसॉन (प्रात्यक्षिक) दाखवण्यासाठी 14 खोल्यांमध्ये नोडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव व त्यांच्या टीम द्वारे प्रत्यक्ष व व्हिडिओ दाखवून घेण्यात आले आहे त्यावेळी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, एक दोन तीन, सहाय्यक मतदान अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले त्यांना माहिती देण्यासाठी झोनल अधिकारी उपस्थित होते

            निवडणूक प्रशिक्षण क्लासरूम व हँडसॉन प्रात्यक्षिक पूर्ण झाल्याने निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे त्यामुळे आगामी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल असा विश्वास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत तथा तहसीलदार सांगोला यांनी व्यक्त केला आहे


कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या उमेदवारांना वाटंबरे गावातून मोठे मताधिक्य देणार: वाटंबरे ग्रामस्थांचा निर्धार

 कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या उमेदवारांना वाटंबरे गावातून मोठे मताधिक्य देणार: वाटंबरे ग्रामस्थांचा निर्धार 



*वाटंबरे गावचे जागृत देवस्थान खंडोबा मंदिर येथे नारळ फोडून कडलास जिल्हा परिषद गटातील उमेदवार , कडलास व अजनाळे गणाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ 


सांगोला /प्रतिनिधी: कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेच्या शोभाताई बाबासाहेब खटकाळे ,कडलास गणाच्या उमेदवार राणीताई सुरज पाटील या उमेदवारांच्या प्रचारार्थ वाटंबरे गावातील जागृत देवस्थान खंडोबा मंदिर येथे नारळ फोडून वाटंबरे गावात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मधुकर पवार , विकास पवार ,दत्तात्रय पवार, यांनी मनोगतात सांगितले की, वाटंबरे गावातून मा.आमदार शहाजीबापू पाटील यांना कायम बहुमत दिले आहे. त्याप्रमाणे या कडलास गटाच्या व गणाच्या उमेदवार राणीताई पाटील यांना मोठे मताधिक्य देऊ असा ठाम संकल्प व्यक्त केला. केंद्रात व राज्यात आपले सरकार असल्याने विकास कामाच्या बाबतीत सांगोला तालुक्याला निधी कमी पडणार नाही. उमेदवार शोभाताई खटकाळे व उमेदवार राणीताई पाटील या दोन उमेदवारांची समाजाशी एकरूपता असल्याने आपले कोणतेही काम भविष्यात आडणार नाही. त्यासाठी या दोन्ही उमेदवारांना वाटंबरे गावातून मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ असा ठाम निर्धार व मनोदय वाटंबरे गावातील ग्रामस्थांनी प्रचार बैठकीदरम्यान व्यक्त केला.



यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका राणीताई माने म्हणाल्या, वाटंबरे गावातून बापूंना लीड दिले जाते. त्याप्रमाणे कडलास गटातील उमेदवारांनाही मोठे लीड द्यावे. या गावात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठी विकास कामे केली आहेत. बापूंच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची एक हाती सत्ता आली आहे. त्यामुळे विकास कामाला आम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीच्या सर्वच उमेदवारांना तालुक्यात चांगले वातावरण असून उमेदवारांना विजयी करणे गरजेचे आहे.भविष्यात बापूंना मोठी साथ मिळेल व तालुक्याच्या विकासाला अधिक गती येईल.

यावेळी मा. जि. प .सदस्य अशोकभाऊ शिंदे, उद्योगपती बाळासाहेब आसबे, म्हणाले, वाटंबरे गावच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून निवडणुकीनंतर आम्ही त्या सोडवण्यासाठी पुन्हा तुमच्या गावात येऊ. 

यावेळी युवानेते योगेशदादा खटकाळे म्हणाले, वाटंबरे गावामध्ये खंडोबा मंदिर येथे ग्रामस्थांनी प्रचाराच्या शुभारंभाला चांगला प्रतिसाद दिला. कडलास गटाचे उमेदवार शोभाताई खटकाळे व कडलास गणाच्या उमेदवार राणीताई पाटील या उमेदवारांचे धनुष्यबाण चिन्ह असून त्यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. मी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करतो. मतदारांनी कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे.गेल्या वर्षभरात तालुक्यातील विकास कामाची स्थिती अनुभवली असेल एकही विकासाभिमुख काम झाले नाही. याचाही मतदारांनी वेळीच विचार केला पाहिजे. 


या कार्यक्रमासाठी अकोला गावच्या सरपंच धनश्री गव्हाणे, चेअरमन लतिका मोटे, नगरसेविका छायाताई मेटकरी, नगरसेविका गोदाबाई बनसोडे, नगरसेविका सीमा सरगर, उद्योगपती सुभाष पवार ,शिवसेना युवानेते सागरदादा पाटील, चेअरमन अनिल खटकाळे, उद्योगपती बाळासाहेब झपके, सुबरावबापू पवार ,नानाबापू पवार, खंडू पवार ,मधुकर पवार, प्रतीक पवार, भारत पवार ,असिफ मुलाणी धीरज पवार, पंडित पवार ,आप्पासाहेब शिंदे, सुखदेव पवार ,प्रवीण पवार, संभाजी पवार, रंगा गेजगे, तानाजी पवार, विनायक पवार, सौदागर भगरे ,संजय पवार, भाग्यवान पवार, संजय कुलकर्णी, राजू शितोळे ,दिलीप पवार, पांडुरंग पवार, साहिल शिंदे, दीपक शिंदे, वैभव गव्हाणे, प्रमोद सावंत ,निरंजन खटकाळे, आयुष खटकाळे, अमोल खटकाळे, शुभम पवार, निलेश खटकाळे, चेतन खटकाळे, शामराव गेजगे, तसेच जयश्री पवार, राधिका पवार, कविता पवार, शोभाताई पवार, शितल जाधव, शारदा माळी, प्रणाली शिंदे, शकुंतला आसबे, अनिता शिंदे ,वनिता केदार, देवयानी खटकाळे, रूपाली गुरव, अश्विनी गुरव, अंजना देशमुख, अक्काताई खटकाळे, जयश्री शिंदे ,सुमन पवार , शोभा खटकाळे चैत्राली शिंदे, रूपाली भोरे ,शारदा खटकाळे, राजाबाई पवार, यांच्यासह आदी मान्यवर, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.




विकासाच्या जोरावर महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित - पोपटशेठ यादव

 विकासाच्या जोरावर महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित - पोपटशेठ यादव




विकास, विश्वास आणि नेतृत्व या त्रिसूत्रीवर चोपडी गटात महायुतीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद 



सांगोला (प्रतिनिधी): चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित असून सर्वसामान्य जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्याचे काम महायुतीने प्रत्यक्ष कृतीतून केले आहे. पाणी, रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत प्रश्नांसह विविध विकासकामांच्या जोरावर चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचाच झेंडा फडकेल. “सांगोल्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. जनतेच्या विश्वासावर, केलेल्या कामांवर आणि विकासाच्या भक्कम पायावरच चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित आहे,” असा ठाम विश्वास शिवसेना नेते व चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव यांनी व्यक्त केला.

       महायुतीच्या निवडणूक प्रचारादरम्यान बोलताना शिवसेना नेते पोपटशेठ यादव म्हणाले की, सांगोल्याचे पाणीदार माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यात विकासाची गंगा वाहत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पाणी प्रश्न मार्गी लागले असून, गावोगावी जलजीवन मिशन, नळ पाणीपुरवठा योजना आणि विकासकामांना गती देण्यात आली आहे. चोपडी गटातील अंतर्गत रस्ते, शेतरस्ते व दळणवळणाच्या सोयीसाठी कोट्यवधींची कामे मार्गी लावण्यात आली. पावसाळ्यात होणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी सिमेंट रस्ते, पुलांची कामे आणि दुरुस्ती प्रकल्प राबविण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर, वीज लाईन दुरुस्ती आणि शेतीसाठी वीजपुरवठा या विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे.

        आरोग्य, शिक्षण, महिला सशक्तीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महायुतीने सातत्याने प्रयत्न केले आहेत. केवळ आश्वासनांचे राजकारण न करता प्रत्यक्ष विकासकामांच्या जोरावरच महायुती निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात महायुतीला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत आहेत. विकास, विश्वास आणि नेतृत्व या त्रिसूत्रीवर आधारित ही लढत असून चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित असल्याची भावना असल्याचे मत शिवसेना नेते व चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव यांनी व्यक्त केले.


वाढेगावात प्रचार शुभारंभाला जनसागर; ‘घड्याळ’ चिन्हाच्या समर्थनात जोरदार एल्गार “घड्याळ चिन्हाला मतदान हीच खरी श्रद्धांजली” असा संदेश मा.अतुल (मालक) पवार

 वाढेगावात प्रचार शुभारंभाला जनसागर; ‘घड्याळ’ चिन्हाच्या समर्थनात जोरदार एल्गार “घड्याळ चिन्हाला मतदान हीच खरी श्रद्धांजली” असा संदेश मा.अतुल (मालक) पवार 



सांगोला प्रतिनिधी: 

वाढेगाव येथे आज झालेल्या भव्य प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड आणि उस्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमस्थळी सकाळपासूनच मोठी गर्दी उसळली होती. रस्ते, चौक आणि परिसरात घोषणाबाजी व जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. स्थानिक राजकारणात या कार्यक्रमाची दिवसभर चर्चा रंगली.

कार्यक्रमादरम्यान कार्यकर्ते व नागरिकांनी दादांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त केली. “घड्याळ चिन्हाला मतदान हीच खरी श्रद्धांजली” असा संदेश देत समर्थकांनी एकजूट दाखवली. विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी बोलताना मा. अतुल (मालक) पवार यांनी विरोधकांवर टीका करत विकासकामांच्या मुद्द्यावर भर दिला. ते म्हणाले, “दादांनी आयुष्य जनतेसाठी दिलं. वाढेगावला आश्वासनं नव्हे तर प्रत्यक्ष काम हवं आहे. घड्याळ चिन्ह हे विश्वास आणि सातत्यपूर्ण कामाचं प्रतीक आहे. जनतेचा कौल काम करणाऱ्यांच्या बाजूनेच लागेल.”

तसेच श्रीकांत दादा देशमुख यांनी आपल्या भाषणात विकासाचा मुद्दा पुढे करत समर्थकांना आवाहन केले. “वाढेगावच्या प्रगतीसाठी ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जनतेने अनुभवातून योग्य-अयोग्य ओळखलं आहे. घड्याळ चिन्हावर ठसा उमटवून विकासाच्या बाजूने उभे राहा,” असे ते म्हणाले.



कार्यक्रमात मा.अतुल (मालक) पवार , शिवसेना शिंदे गट युवा नेते मा. सागर पाटील, नूतन नगराध्यक्ष मा. आनंद भाऊ माने. नगरसेवक मा. काशिलिंग गावडे नगरसेवक मा.माऊली तेली, भाजपा उमेदवार सो भारती लालासाहेब देशमुख, शिवसेना उमेदवार सौ. राणी गजानन उबाळे

स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रचार शुभारंभानंतर गावात राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागल्याचे चित्र आहे.


शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६

कडलास जिल्हा परिषद गटातील, कडलास गणातील, व अजनाळे गणातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार धुमधडाक्यात सुरू, प्रचाराला जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद

 कडलास जिल्हा परिषद गटातील, कडलास गणातील, व अजनाळे गणातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार धुमधडाक्यात सुरू, प्रचाराला जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद



*कडलास जिल्हा परिषद गटातील चिणके, अजनाळे, कमलापूर, वझरे य.मंगेवाडी येथे प्रचारानिमित्त कुटुंबांना दिल्या भेटी.

सांगोला/ प्रतिनिधी:कडलास जिल्हा परिषद गटातून महायुतीच्या उमेदवार शिवसेनेच्या शोभाताई बाबासाहेब खटकाळे ,कडलास गणाच्या शिवसेनेच्या उमेदवार राणीताई सुरज पाटील ,अजनाळे गणाच्या भाजपच्या उमेदवार शितल सचिन भंडगे निवडणूक लढवीत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकारी ,मान्यवर ,कार्यकर्त्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.       


       ‌अजनाळे गणातील‌ अजनाळे, कमलापूर , य.मंगेवाडी, चिणके, वझरे या गावांमध्ये प्रचार करण्यात आला व महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याबाबत आवाहन करण्यात आले.


जनता दारात… नेते गायब! आता मात्र अतुल (मालक) पवार लोकांच्या दारी — विरोधकांची झोप उडाली

 जनता दारात… नेते गायब! आता मात्र अतुल (मालक) पवार लोकांच्या दारी — विरोधकांची झोप उडाली



लोक नेत्यांकडे धावत होते… आता नेता स्वतः लोकांकडे धावत आहे — अतुल (मालक) पवार यांची कार्यपद्धती चर्चेत

सांगोला प्रतिनिधी:

आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना आपली कामे, अडचणी आणि प्रश्न घेऊन पुढाऱ्यांच्या दारात तासन्‌तास थांबावे लागत होते. “उद्या या, परवा या” म्हणत लोकांची फिरवाफिरवी करणारी राजकीय संस्कृती अनेक वर्षे चालू होती. मात्र अतुल (मालक) पवार यांनी ही जुनी पद्धत मोडीत काढत लोकांकडे थेट जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याची नवी कार्यशैली सुरू केली आहे.

आजवरची राजकीय परंपरा काय होती? — जनतेने नेत्यांच्या दारात उभं राहायचं, विनवण्या करायच्या, आणि शेवटी “पाहू पुढे” असं उत्तर घेऊन परत जायचं.

पण आता चित्र उलटं झालंय. अतुल (मालक) पवार यांनी नेत्यांनाच लोकांच्या दारात जाऊन कामे व अडचणी विचारण्याची सवय लावली आहे.


गावागावात भेटी, प्रत्यक्ष संवाद आणि त्वरित निर्णय — या त्रिसूत्रीवर काम करत अतुल पवार यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, अनेक वर्षे सत्तेत राहूनही केवळ आश्वासनांची फुगे उडवणाऱ्या विरोधकांवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. निवडणुका आल्या कीच जनतेची आठवण काढणारे आणि उरलेल्या काळात गायब होणारे काही नेते आता अचानक सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र “काम केलेल्यालाच मान” अशी स्पष्ट भूमिका मतदार घेत असल्याचे दिसून येते.

लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी केवळ टीका आणि अडथळे निर्माण करणाऱ्या विरोधकांपेक्षा प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेतृत्वाला लोक प्राधान्य देत आहेत. “कार्यालयात बसून राजकारण” करणाऱ्यांना आता “मैदानात उतरून काम” करणाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.



 


Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart