Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

वाटंबरे येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

वाटंबरे येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न.
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुका वाटंबरे येथे मंगळवार दि. २५ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल प्रशालेच्या प्राणंगणात केंद्रस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीता पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच नामदेव पवार, केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार,किरण पवार, हणमंत निकम, दत्तात्रय मासाळ नारायण पवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
या स्पर्धेत वाटंबरे केंद्रातील १३ शाळांनी सहभाग नोंदविला.
  लंगडी, खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ, 100 मीटर धावणे ,200 मीटर धावणे या स्पर्धा यावेळी या स्पर्धेत घेण्यात आल्या .
लंगडी या खेळात लहान गट मुले व मुलींमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिणके यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसले मळा यांनी पटकाविला कबड्डी व खो खो या खेळात लहान मुले व मुली गटात चिनके शाळेने प्रथम क्रमांक पटकावला तसेच द्वितीय क्रमांक भोसले मळा या शाळेने पटकविला तसेच 100 मीटर धावणे या स्पर्धेत चिणके या शाळेतील शंभूराजे मिसाळ या मुलाने प्रथम क्रमांक पटकाविला मुलीमध्ये काव्यानंद मिसाळ हिने प्रथम क्रमांक पटकाविला तसे 200 मीटर धावणे या स्पर्धेत मुलींमध्ये काव्यानंद मिसाळ हिने नंबर पटकावला तसेच बुद्धिबळ या स्पर्धेत चैतन्य मिसाळ यांनी बाजी मारली एकंदरीत या सर्व स्पर्धेमध्ये चिणके जिल्हा परिषद शाळेचा दबदबा दिसून आला.

No comments