Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ “उन्मेष सृजनरंगाचा” युवा महोत्सव सुगम गायन, जलसा, इंग्रजी वक्तृत्व, शास्त्रीय नृत्य, स्थळचित्रण, पथनाटय, लोकवाद्य वृंद व कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ “उन्मेष सृजनरंगाचा” युवा महोत्सव


सुगम गायन, जलसा, इंग्रजी वक्तृत्व, शास्त्रीय नृत्य, स्थळचित्रण, पथनाटय, लोकवाद्य वृंद व कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न  




संगीत मंच (सुगम गायन स्पर्धा) -


सुगम गायन हा मराठी भाषेतील एक संगीत प्रकार आहे जो सोप्या आणि सहज गाण्यांच्या शैलीत माणसांच्या मनाशी जोडतो. हे संगीत हे अत्यंत सोप्या शब्दात असते आणि सूर हे समजायला खूप सोपे असतात. तसेच आनंद घेण्यासाठी त्यांचा उपयोग होतो सुगम संगीत या प्रकारामध्ये गझल, भजन, अभंग, लोकप्रिय गाणी आणि नाट्य संगीत या कला प्रकारांचा समावेश होतो.



या स्पर्धेचे उदघाटन डॉ. अजिंक्‍य नष्टे यांच्याहस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, सहसमन्वयक डॉ. राजकुमार ताठे, प्रा. सुर्यकांत पाटील उपस्थित होते. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 24 संघानी सहभाग नोंदविला.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. महेश बडवे, प्रा.सुभाष पाटील, प्रा.आदर्श झपके, प्रा. सोनाली पाटील, प्रा. तेजस्विनी मिसाळ, श्री. महादेव काशिद व पवन माळी यांनी सहकार्य केले.


 



लोककला मंच (जलसा स्पर्धा ) –


जलसा स्पर्धेमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम संगीत, नृत्य, नाटक, वक्तृत्व, गायन आणि इतर कला सादर केल्या जातात. ही स्पर्धा प्रामुख्याने मराठी सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कलाकारांना त्यांचे कौशल्य लोकांसमोर मांडण्यासाठी आयोजित केली जाते. या स्पर्धे द्वारे विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक विकास नवकलाकारांना प्रोत्साहन व समाजामध्ये सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी या जलसा स्पर्धेचा उपयोग होतो.


या स्पर्धेचे उदघाटन डॉ. सुदिप चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, युवा महोत्सव समन्वयक डॉ. रामचंद्र पवार उपस्थित होते. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 09 संघानी सहभाग नोंदविला.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा सदाशिव शिंदे, डॉ दीपक कवडे, प्रा कृष्णा पवार, प्रा शिवरत्न होनराव,


प्रा संतोष लवटे, प्रा अमोल कावळे, प्रा उदय पाटील, प्रा महेश घाडगे, प्रा शाहरुख मुलाणी,श्री शंकर माने व स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.


वाड:मय मंच (इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा)


इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा ही विद्यार्थ्यांना आपले विचार भावना आणि कल्पना स्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडण्याची संधी देणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेचा उपयोग विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य वाढवणे त्यांचा आत्मविश्वास वाढवणे संवाद कौशल्य व विचारांची मांडणी कशी करावी याबद्दलची तयारी ही विद्यार्थ्यांकडून या स्पर्धेमार्फत होते. या स्पर्धेसाठी वसुदैव कुटूंबकम, सावध ऐका पुढच्या हाका, पाऊस पाऊस आणि पाऊस हे विषय देण्यात आले होते.


या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 31 संघानी सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बबन गायकवाड, डॉ. नवनाथ शिंदे, डॉ. भाग्यश्री पाटील,  श्री. राहुल ढोले व स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.


 


 


मुख्यरंग मंच ( शास्त्रीय नृत्य)


शास्त्रीय नृत्य म्हणजे भारतातील पारंपरिक, धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांवर आधारित नृत्यप्रकार आहे. हे नृत्य केवळ मनोरंजनासाठी नसून, भगवंताची उपासना, भाव, राग, ताल आणि अभिव्यक्तीचा समन्वय म्हणून ओळखले जाते. भरतनाट्यम,कथक,कथकळी,मणिपुरी,ओडिसी मोहिनियाट्टम, कुचिपुडी, सत्त्रिया इत्यादी कलाप्रकारांचा शास्त्रीय नृत्यात समावेश होतो.


या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 10 संघानी सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.विजयकुमार गाडेकर, प्रा. सिध्देश्वर कुलकर्णी, डॉ आर. जी. खानापुरे, प्रा सौ वसुंधरा ढेकळे, प्रा विशाल कुलकर्णी, प्रा अतिश पवार, प्रा सचिन सुरवसे, प्रा.आशांक भोसले, प्रा. प्रज्ञा गायकवाड, प्रा. तेजस्विनी पवार, प्रा कु पूनम हेटकळे, श्री. ज्ञानेश्वर कुलकर्णी, श्री. भाऊसो गायकवाड, श्री. सिध्देश्वर स्वामी, श्री. सत्यवान भासले व स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.


ललित मंच (स्थळचित्रण) -


स्थळचित्रण म्हणजे एखाद्या ठिकाणाचे दृश्यात्मक किंवा लिखित वर्णन करणे होय. नकाशा किंवा भूगोलशास्त्रीय स्थळचित्रण, चित्रात्मक स्थळ चित्रण आणि लिखित स्थळ चित्रण हे स्थळ चित्रीकरणाचे विविध प्रकार आहेत स्थळ चित्रण हे आपण पर्यटनासाठी, शिक्षणासाठी, नकाशा द्वारे मार्गदर्शन करण्यासाठी व साहित्य व कला यांची जाणीव ही वाचकाला होण्यासाठी याचा आपण उपयोग करतो.


स्थळचित्रण या स्पर्धेसाठी युवा महोत्सवातील प्रसंग हा विषय होता. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 30 संघानी सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.व्ही एस जाधव, प्रा. सोनल भुंजे, प्रा. शंकर पाटील, प्रा. प्राप्ती लांमगुंडे यांनी परिश्रम घेतले.


पथनाटय-


पथनाट्य म्हणजे सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर सादर केलं जाणारं नाटक. यात पारंपरिक रंगमंच नसतो, आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधला जातो. हे नाटक प्रामुख्याने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक किंवा जनजागृतीसाठी वापरलं जातं. पथनाटयाचा उपयोग समाजप्रबोधन, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, सामाजिक विषया विषयी तात्काळ प्रभाव पाडणे, मनोरंजनासह संदेश देणे.


पथनाटय या स्पर्धेसाठी राष्ट्रीय एकात्मता, स्त्रीभ्रूण हत्या, भष्ट्राचार, पर्यावरण, अंधश्रध्दा निमूर्लन व सामाजिक समस्या हे विषय होते.  या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 33 संघानी सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.ओंकार घाडगे, प्रा.प्रशांत गोडसे, प्रा.दयानंद जुंदळे, प्रा.सुशांत शिंदे, प्रा. जगदीश चेडे यांनी परिश्रम घेतले.


मुख्यरंग मंच (लोकवाद्य वृंद)


लोकवाद्य वृंद म्हणजे अनेक पारंपरिक वाद्य वाजवणारा एक गट किंवा संच, जो लोकसंगीत, नृत्य, उत्सव किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक धून वाजवतो. यामध्ये वेगवेगळी वाद्ये एकत्र वाजवली जातात आणि त्या संगीतातून प्राचीन परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडते. पारंपरिक कलेचे संरक्षण होते. लोकवाद्यवृंदाचा उपयोग


एकात्मता, कला शिक्षणासाठी होतो.


या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 06 संघानी सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.विजयकुमार गाडेकर, प्रा. सिध्देश्वर कुलकर्णी, डॉ आर. जी. खानापुरे, प्रा सौ वसुंधरा ढेकळे, प्रा विशाल कुलकर्णी, प्रा अतिश पवार, प्रा सचिन सुरवसे, प्रा.आशांक भोसले, प्रा. प्रज्ञा गायकवाड, प्रा. तेजस्विनी पवार, प्रा कु पूनम हेटकळे, श्री. ज्ञानेश्वर कुलकर्णी, श्री. भाऊसो गायकवाड, श्री. सिध्देश्वर स्वामी, श्री. सत्यवान भासले व स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.


वाड:मय मंच (कथाकथन स्पर्धा)


"कथाकथन स्पर्धा" ही एक अशी स्पर्धा असते ज्यामध्ये सहभागी स्पर्धक स्वतःची कथा, अनुभव, किंवा एखादं सर्जनशील कथानक प्रेक्षकांसमोर प्रभावी पद्धतीने सादर करतात. या स्पर्धेचा उददे्श भाषा, सृजनशीलता आणि अभिव्यक्ती कौशल्य वाढवणे, लोककथांचा, ऐतिहासिक घटना, किंवा काल्पनिक कथांचा प्रसार करणे.


विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सार्वजनिक भाषण कौशल्य वाढवणे होय.


या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 32 संघानी सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बबन गायकवाड, डॉ. नवनाथ शिंदे, डॉ. भाग्यश्री पाटील,  श्री. राहुल ढोले व स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.



यावेळी कार्यक्रमस्थळी राष्ट्रीय सेवा योजना व  राष्ट्रीय छात्र सेना यांचेवतीने सिध्दीविनायक कॅन्सर हॉस्पिटल, मिरज  रक्तादान शिबीर तसेच सांगोला पचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल यांचेवतीने डॉ.यशोदिप गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.


स्थळछायाचित्रण, पोवाडा, शास्त्रीय सुरवाद्य, नकला, व्यंगचित्र, कव्वाली व एकांकीका स्पर्धेचे सादरीकरण चालू  होते.

No comments