चिनके येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजन अभियानाची मोठ्या उत्साहात सुरुवात.
चिनके येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजन अभियानाची मोठ्या उत्साहात सुरुवात.
बुधवार दि 17 सप्टेंबर रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर स्मितापाटील यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सांगोला पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी हे उपस्थित होते. सरपंच नाथा खंडागळे ,उपसरपंच मोहन मिसाळ हे व्यासपीठावर होते. या कार्यक्रमा प्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता पाटील म्हणाल्या की मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सक्षमपणे राबवा लोकांचे हिताची लोकोपयोगी कामे करा चिणके ग्रामपंचायतच्या वतीने ज्या नावीन्यपूर्ण योजना राबविले आहेत त्या योजनांचे त्यांनी मनापासून कौतुक केले या अभियानात सहभाग घेऊन ग्रामपंचायत सक्षम करण्याचे आवाहन हे त्यांनी केले. गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी अवियानाची संपूर्ण सविस्तर माहिती दिली. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक दिवस पंचायत समिती सर्व अधिकारी घेऊन ग्रामपंचायतला येऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाची प्रस्तावना मोहन मिसाळ उपसरपंच ग्रामपंचायत यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुलगा राजकर अंगणवाडी सेवक यांनी केले आभार प्रदर्शन व विशेष योजनांची माहिती विनायक मिसाळ ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली. या कार्यक्रमास ग्राम विकास अधिकारी अण्णासाहेब भडंगे महसूल अधिकारी श्री बागमोडे अंगणवाडी प्रकल्प संचालक श्री आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक श्री बंडगर गुरुजी हनुमंत पवार गुरुजी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी तंटामुक्ती अध्यक्ष उमेश मिसाळ पोलीस पाटील पवार माजी सैनिक संघटनाचे सर्व पदाधिकारी बचत गटांचे प्रतिनिधी बँक ऑफ महाराष्ट्र चे मॅनेजर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



No comments