रांझणी येथे टीबी मुक्त भारत अभियान शिबिर संपन्न.....*.
* रांझणी येथे टीबी मुक्त भारत अभियान शिबिर संपन्न.....*.
वाटंबरे /प्रतिनिधी:
माननीय डॉक्टर एकनाथजी बोधले साहेब तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती पंढरपूर यांच्या आदेशा नवे तसेच माननीय डॉक्टर संतोषजी सासवडकर साहेब, माननीय डॉक्टर अमोलजी भोसले साहेब वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पुळुज, डॉक्टर नितीनजी देशपांडे साहेब डॉक्टर सिमरनजी पठाण मॅडम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र रांझणी यांच्या मार्गदर्शना नुसार, श्री कासिम जमादार आरोग्य निरीक्षक व श्री अंकुश वाळके आरोग्य निरीक्षक तसेच श्रीमती इंदुमती धारेराव आरोग्य सहाय्यिका प्राथमिक आरोग्य केंद्र पुळुज यांच्या सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र पुळुज अंतर्गत उपकेंद्र रांझणी येथे आज दिनांक 15 /9 /2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणी येथे टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत शिबिर घेण्यात आले यामध्ये साठ वर्षावरील व्यक्ती, मधुमेह रुग्ण, धुम्रपान करणारे व्यक्ती, मागील पाच वर्षातील क्षयरुग्ण संपर्कातील व्यक्ती असे सर्वांना बोलावून त्यांची बी पी, शुगर, थुंकी नमुना इत्यादी तपासणी करून त्यांना उपचार देण्यात आला. यावेळी श्री अशोक कलाल आरोग्य निरीक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणी यांनी उपस्थित सर्व लाभार्थींना क्षयरोग, मधुमेह व इतर आजारावर आरोग्य शिक्षण दिले. तसेच सर्व लाभार्थ्यांच्या प्रयोगशाळा तपासणी श्री सुधीर पाटील आरोग्य सेवक व श्रीमती वंदना भगरे आरोग्य सेविका यांनी केल्या. समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर युगंधरा शिंदे मॅडम यांनी लाभार्थ्याची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात आला. यावेळी आशा वर्कर श्रीमती राधा मोरे, सारिका शिंदे, शितल पंडित, रेश्मा जाधव, शोभा माने, यांनी मोलाचे सहकार्य केले व सर्व लाभार्थ्यांना बोलावले. या शिबिरामध्ये एकूण 45 लाभार्थ्याची तपासणी व उपचार करण्यात आला. शेवटी स्वयंसेवक श्री लक्ष्मण गांडुळे यांनी उपस्थित सर्वांचे मनापासून आभार मानले.....



No comments