Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

दऱ्यापा नाना च्या कार्याचा समाजाने आदर्श घ्यावा:वैभव पाटील

 दऱ्यापा नाना च्या कार्याचा समाजाने आदर्श घ्यावा:वैभव पाटील.

समर्थ व्यसनमुक्ती केंद्र मार्फत दऱ्यापा दत्तू यांचा सत्कार संपन्न)

मंगळवेढा:समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था, न्यूट्रीस्टार हेल्थ प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड  संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 'आधार निवासी व्यसनमुक्ती केंद्र मंगळवेढा' यांच्या वतीने  नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी मुख्यलेखापाल दऱ्यापा(नाना) दत्तू यांना अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा मंगळवेढ्याचा 2025 सलाचा 'समाज भूषण पुरस्कार ' प्राप्त झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी दऱ्यापा नाना यांनी आधार निवासी व्यसनमुक्ती केंद्राच्या च्या कार्याचे कौतुक करताना वैभव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यसनमुक्तीचा घेतलेला ध्यास पाहता त्यांचे व्यसनमुक्त समाज हे स्वप्न लवकरच पूर्ण होवो अशा सदिच्छा व्यक्त केला. यावेळी निवासी व्यसनमुक्ती केंद्रप्रमुख वैभव पाटील यांनी नानांच्या पुरस्काराबद्दल कौतुक करून त्यांना दिर्घयुष्य लाभावे त्यांनी व्यसनमुक्तीच्या कार्यास आमच्या मागे ठामपणे उभे राहून सहकार्य करावे आशा सदिच्छा व्यक्त केल्या. 

         या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे सर यांनी समर्थ संस्थेच्या 'व्यसनमुक्त भारत अभियानाची' सविस्तर माहिती देऊन भविष्यातील वाटचालीचा आलेख मांडला.समर्थ प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक दिनेश मुदगुल सर यांनी या उपक्रमाच्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.यावेळी केंद्राचे प्रमुख सहकारी युवराज घोडके, अंबादास शिंदे,मोहन वाडेकर, नितीन कांबळे यांच्यासह केंद्र सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( समर्थ व्यसनमुक्ती केंद्र मार्फत दऱ्यापा दत्तू यांचा सत्कार संपन्न)

No comments