सांगोला महाविदयालयाचे वार्षिक नियतकालिक “माणदेश“ प्रकाशन संपन्न .
सांगोला महाविदयालयाचे वार्षिक नियतकालिक “माणदेश“ प्रकाशन संपन्न 
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला महाविद्यालयात 01 मे 2025 रोजी महाविदयालयाचे वार्षिक नियतकालिक “माणदेश” चे प्रकाशन संपन्न झाले. या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन संस्था अध्यक्ष मा. बाबुराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष मा.प्रा.पी. सी. झपके, माजी सचिव म.सि.झिरपे, सहसचिव मा. साहेबराव ढेकळे साहेब, संस्था सदस्य मा.सुरेश फुले साहेब, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, कॅप्टन संतोष कांबळे आणि नियतकालिकाचे संपादक डॉ. अमोल पवार व मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे कौतुक करत नियतकालिकातून व्यक्त होणाऱ्या विचारविश्वाचे महत्व् अधोरेखित केले. “माणदेश” नियतकालिक हे विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यास चालना देणारे असून, त्यात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक लेखांचे समावेश आहे. प्रकाशन सोहळयाचे संयोजन आणि नियोजन प्रभावीरित्या पार पाडण्यात आले.
माणदेश नियतकालिकेसाठी सहसंपादक म्हणून डॉ. बबन गायकवाड, डॉ. विधिन कांबळे, डॉ. मालोजी जगताप, डॉ. रेणुकाचार्य खानापुरे, डॉ. जमीर तांबोळी, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. विशाल कुलकर्णी, प्रा. प्रज्ञा काटे, प्रा. प्राप्ती लामगुंडे, प्रा. तेजश्री मिसाळ यांनी परिश्रम घेतले. तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विदयार्थी यांचे सहकार्य लाभले.

No comments