सर्वसामान्य नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना दाखले देण्यासाठी शासन कटिबद्ध... -तहसीलदार संतोष कणसे*
*सर्वसामान्य नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना दाखले देण्यासाठी शासन कटिबद्ध... -तहसीलदार संतोष कणसे*
नाझरे प्रतिनिधी
सर्वसामान्य नागरिकांना व विद्यार्थ्यांना लागणारे सर्व दाखले त्वरित मिळण्यासाठी शासन कटिबद्ध असून, महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत दाखले वाटप सुरू करण्यासाठी नाझरे विद्यामंदिर मध्ये आज या शिबिराचे आयोजन केले असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार संतोष कणसे यांनी उद्घाटन प्रसंगी मत व्यक्त केले.
नाझरे ता. सांगोला येथे मंडल निहाय मधून सर्व समावेशक दाखले यामध्ये नाझरे 376 दाखले, कोळेमंडल मधून 185 दाखले तर हातीद मंडल मधून 263 असे 824 दाखले वाटप करण्यात आल्याचे नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांनी सांगितले.

No comments