सांगोला महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन.
सांगोला महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन.
सांगोला/प्रतिनिधी:
सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त् शुक्रवार दि. 03 जानेवारी 2025 रोजी अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व डॉ. सिमा गायकवाड (डॉ.गणपतराव देशमुख महाविदयालय, सांगोला) त्यांच्या प्रतिमेस पुष्प्हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, ज्या काळात स्त्री घरात ‘ चूल आणि मूल ’ इथपर्यंत मर्यादित होती, त्या वेळी स्त्रीयांना उंब-याच्या बाहेर आणून सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. स्त्रियांना सन्मानाचे जीवन मिळवून दिले. आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. आजच्या मुलींनी याची जाणीव ठेवून आपले करीअर घडविले पाहिजे.

No comments