आपल्या संसारातून मित्र परिवाराला वेळ देऊन त्यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून क्षितिजाची उंच शिखरे पार केली: मुख्याध्यापक नवनाथ शिंदे.
आपल्या संसारातून मित्र परिवाराला वेळ देऊन त्यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून क्षितिजाची उंच शिखरे पार केली: मुख्याध्यापक नवनाथ शिंदे.
(विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल एसएससी १९९७-९८ या बॅचमधील मित्रांचा सत्कार )
वाट़बरे /प्रतिनिधी:
आज आपल्या एसएससी बॅचमधील सर्व मित्र आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत व त्यांनी त्या क्षेत्रात कार्यरत असताना त्यांच्याकडे आदराने पाहावे असे काम त्यांनी त्या क्षेत्रात केले आहे तसेच आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती असणारे आपले वर्गमित्र यांचे खरंतर कार्य कौतुकास्पद आहे त्यांनी आपल्या संसारातून मित्र परिवाराला वेळ देऊन त्यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून क्षितिजाची उंच शिखरे पार केलीच आहेत त्यामुळे आज मला या बॅचेसचा विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो असे गौरवोद्गार १९९७- ९८ बॅचेस चे विद्यार्थी व आता रयत शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असणारे नवनाथ शिंदे सर सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
रविवार दि. २९ डिसेंबर रोजी १९९७-९८ एसएससी बॅचमधील अमित गायकवाड यांची महसूल साहय्यक पदी निवड तसेच पत्रकार दत्तात्रय पवार यांची महाराष्ट्र राज्य सांगोल तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सचिव पदी तसेच वाटंबरे गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष भारत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या सर्वांचा त्यांचे वर्ग मित्र यशराज गांडूळ खत प्रकल्पाचे उद्योजक सुरेश पवार यांच्या निवासस्थानी सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी पत्रकार दत्तात्रय पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले आता माझ्या मित्रांनी केलेल्या सत्कारामुळे मी भारावून गेलो आहे या सत्काराने मला एक काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या माणसाची थाप पाठीवर असणे गरजेचे असते त्यामुळे त्या व्यक्तीला काम करण्याची नवीन प्रेरणा मिळत असते तसेच यावेळी त्यांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांच्या अडचणी सांगून एकमेकाला सहाय्यक करत प्रगतीची शिखरे पार करूया असे म्हटले.
सत्कारमूर्ती अमित गायकवाड व भारत पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केली.
या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला एसएससी ग्रुप मधील यशराज गांडूळ खत प्रकल्पाचे उद्योजक सुरेश पवार, सोसायटी सचिव दत्तात्रय बंडगर, बाळासाहेब कोकरे, सुरेश चौगुले, सिताराम पवार, चिमाजी गवळी, बंडू पवार उपस्थित होते.





No comments