Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, १५ जानेवारी, २०२५

दिपकआबांच्या हस्ते डिकसळ सोसायटीचे नूतन चेअरमन अरविंद कोरे यांचा सत्कार

दिपकआबांच्या हस्ते डिकसळ सोसायटीचे नूतन चेअरमन अरविंद कोरे यांचा सत्कार 


सांगोला ( तालुका प्रतिनिधी): डिकसळ विकास सेवा सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी अरविंद लक्ष्मण कोरे यांची निवड झाल्याबद्दल जिल्ह्याचे नेते मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नूतन पदाधिकाऱ्यांनी सोसायटीचा पारदर्शी कारभार करून गावाचा नावलौकिक वाढवावा. सोसायटीच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिले.
     डिकसळ विकास सेवा सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी बुधवारी पार पडल्या. सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी अरविंद लक्ष्मण कोरे यांची निवड करण्यात आली. जिल्ह्याचे नेते मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सोसायटीचे नूतन चेअरमन अरविंद कोरे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नूतन पदाधिकाऱ्यांनी विकास सेवा सोसायटीचा कारभार पारदर्शक करून गावाचा नावलौकिक वाढवावा. विकास सेवा सोसायटीच्या आर्थिक प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिले. यावेळी माजी सरपंच चंद्रकांत करांडे, सरपंच मधुकर करताडे, माजी उपसरपंच सुनिल बाबर, माजी उपसरपंच रणजित गगणे, उपसरपंच मिलिंद कुलकर्णी यांच्यासह सोसायटीचे संचालक, नागरिक उपस्थित होते.

फोटो ;

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart