Ad Code

 

Ticker

6/recent/ticker-posts

सांगोला तालुक्याचा दुष्काळाचा कलंक संपवला- आम. शहाजीबापू पाटील

सांगोला तालुक्याचा दुष्काळाचा कलंक संपवला- आम. शहाजीबापू पाटील

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील हातीद, अजनाळे, कडलास येथील सभेस मोठा प्रतिसाद

सांगोला/ प्रतिनिधी-महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वा दोन वर्षात महाराष्ट्रात विकासाभिमुख कामे करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी‌ आमदार शहाजीबापू पाटील यांना सांगोला तालुक्याच्या विकासासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी देऊन तालुक्याचा परिपूर्ण विकास करण्यासाठी प्रेरित केले. आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. तसेच समाजातील प्रत्येक घटकाच्या  विकासासाठी निधी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. सांगोला तालुक्यासाठी अनेक योजनांचे पाणी आणून सांगोला तालुक्याचा दुष्काळाचा कलंक संपवला असे विचार आमदार शहाजीबापू पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कडलास व्यक्त केले.
यावेळी भाजप कार्यकारणी सदस्या राजश्रीताई नागणे पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख,भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीअण्णा गायकवाड , किसान सेलचे शशिकांतभाऊ देशमुख ,सुनीलनाना  पवार , शिवसेनेचे नेते विजयदादा शिंदे ,माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार ,डॉ. विजय बाबर, सरपंच दिगंबर भजनावळे, दत्ता टापरे, भीमशक्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्यअध्यक्ष विजय बनसोडे, मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष दीपक ऐवळे, बापू कोळवले, सज्जन भडंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले,अखेरच्या श्वासापर्यंत तालुक्यातील जनतेच्या सेवेमध्येच राहणार असून ही निवडणूक अटीतटीची असल्याने मतदारांनी गाफील राहू नये. प्रत्येक व्यक्तीचे मत महत्त्वाचे असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन आम. शहाजीबापू पाटील  यांनी प्रचार सभेदरम्यान केले .
  यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की,तालुक्यात कामाचा आम. म्हणून शहाजीबापूंचा उल्लेख करावा लागेल.‌‌ तरुणांना यापुढे नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही.  आम. शहाजीबापू पाटील हे तालुक्यात मोठी एमआयडीसी आणून तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार आहेत. तालुक्यातील लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाला मतदान रुपाने दान द्यावे. तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास शहाजीबापू पाटील हेच करणार आहेत. बापूंनी  कोरडा व माण नदीला कालव्याचा दर्जा दिला आहे.  शेतीच्या पाण्यासाठी वेगवेगळ्या योजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने हा प्रश्न सोडवण्यात शहाजी बापूंना मोठे यश आले आहे.खऱ्या अर्थाने शहाजीबापू पाटील यांच्याकडे तालुक्याविषयी आत्मीयता  असून त्यांना या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करावे असे महायुतीच्या पदाधिकारी, मान्यवरांनी आवाहन केले.

Post a Comment

0 Comments