Ad Code

 

Ticker

6/recent/ticker-posts

फक्त एक संधी द्या, मतदारसंघाचा कायापालट करून दाखवतो ; दिपकआबा साळुंखे पाटील

फक्त एक संधी द्या, मतदारसंघाचा कायापालट करून दाखवतो ; दिपकआबा साळुंखे पाटील 

महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना भाळवणी गटात प्रचंड प्रतिसाद 


सांगोला तालुका प्रतिनिधी 

गेल्या ३०-३५ वर्षांपासून समाजातील गोरगरीब, वंचित, उपेक्षित घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. गणपतराव देशमुख व शहाजीबापू पाटील यांच्या विजयात मोलाचा भूमिका बजावली. पण, केलेल्या मदतीचा त्यांना विसर पडला आहे. परंतु, या दोघांच्या विजयात मी केलेली मदत जनता अद्यापही विसरली नाही. जनतेच्या पाठिंब्यावर मी जनतेचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो आहे. गेल्या ६० वर्षांपासून विरोधकांना मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. त्यासाठी एकवेळ येथील लोकप्रतिनिधी बदला, एकवेळ बदल घडवून बघा, महाविकास आघाडीच्या माधमातून मतदारसंघाचा कायापालट केल्‍याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मतदार संघातील पायाभूत सुविधांसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.
    महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ तिसंगी, सोनके, पळशी, सुपली, धोंडेवाडी या गावात प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदारांशी संवाद साधताना दिपकआबा बोलत होते. 
         यावेळी बोलताना दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले की, गेल्या ६० वर्षात विरोधकांनी जनतेची दिशाभूल केल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. गेल्या ३०-३५ वर्षापासून जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. हक्काच्या पाण्यासाठी ६० वर्षांपासून लढा सुरू आहे. एकवेळ जनतेची सेवा करण्याची संधी द्या, पाच वर्षे जनतेचा सालगडी म्हणून काम करणार असल्याचा विश्वास दिपकआबांनी व्यक्त केला.
       यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, साईनाथ अभंगराव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश देठे, दत्तात्रय देठे, विशाल गायकवाड, अजित देवकते, अवि देशमुख, मोहसीन तांबोळी, आर.डी.पवार, भारत कोळेकर, मधुकर हाके, दशरथ थोरात, दत्तात्रय थोरात, तानाजीराव गोफने, अर्जुन खरात, दत्तात्रय पाटील, लक्ष्मण थोरात, धोंडीबा थोरात, बाळासाहेब कोळेकर, संतोष गायकवाड, तानाजी गायकवाड, माजी उपसरपंच शिवाजी येलमर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लाडे, तुकाराम येलमर, अनिल विभुते, विठ्ठल लाडे, विश्वजीत येलमर, सुधाकर माळी, विशाल कांबळे, रामचंद्र मसुकडे, दिलीप पाटील, नागनाथ जावीर, हणमंत कदम, सुखदेव लोखंडे, युवासेनेचे तालुकाप्रमुख सुभाष भोसले, माजी सरपंच संभाजी देठे, राम बाबर, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते. 



शिवसेनेचा पहिला कारखाना होतोय म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मदत केली म्हणून चंद्रभागा कारखाना उभा राहीला आणि शेतकऱ्यांचा १४ वर्षाचा वनवास संपला. ज्या-ज्या वेळी कल्याणराव काळे अडचणीत आले त्या-त्या वेळी सर्वांचा विरोध पत्करून शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून कल्याणराव काळे यांचा चंद्रभागा साखर कारखाना वाचविण्यासाठी उभा राहिलो. शेतकऱ्यांचा ऊस चंद्रभागा कारखान्याला जावा यासाठी कल्याणरावांच्या साखर कारखान्याला मी स्वतः पुढाकार घेऊन मदत केली अन् कारखाना वाचवला. सोनके तलावात पाणी सोडण्यासाठी अकलूजकरांनी सातत्याने आडकाठी भूमिका घेत आमच्यावर अन्याय केला. समाजमंदिर बांधून विकास होत नसतो त्यासाठी बेरोजगारांच्या हाताला काम, शेतीला २४ तास वीजपुरवठा, शेतीमालाला हमीभाव आणि शेतीसाठी पाण्याची गरज असते. म्हणून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिवसेनेची मशाल घराघरात पोहोचवा आणि दिपक आबा साळुंखे पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव यांनी केले.


Post a Comment

0 Comments