Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सुख, शांती व समाधानासाठी परम रहस्य ग्रंथ वाचन गरजेचे... राय पाटणकरमहास्वामीजी*

*सुख, शांती व समाधानासाठी परम रहस्य ग्रंथ वाचन गरजेचे... राय पाटणकर
महास्वामीजी

नाझरे प्रतिनिधी 
         मानवी जीवनात सुख, शांती व समाधान पाहिजे असेल तर परमर्य ग्रंथाचे वाचन व अवलोकन करा व यामुळे धर्माला, विश्वाला शांती मिळते. व वीरभद्र जयंती निमित्त नाझरे ता. सांगोला येथील मंदिरात परमरस्य ग्रंथाचे वाचन सुरू आहे याप्रसंगी श्री श्री श्री, 108 श्री गुरु महादया रविशंकर शिवाचार्य राय पाटणकर महाराज यांनी प्रवचनात सांगितले. 
        तसेच आपण समाजात वावरत असताना धर्माचे पालन करा, वाईट बोलू नका, कोणालाही नावे ठेवू नका व ओम वीरभद्राय नमः या महामंत्राचा जप करा कारण वीरभद्राने दुष्टाचा सहर केला व आज परम रहस्य ग्रंथाचे वाचन मंदिरात सुरू यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे व तुम्ही सर्व वीर्षेवर धर्मात जन्म घेणे म्हणजे शिवाचा तो आशीर्वादच आहे. तसेच शुद्ध भाव ठेवून गुरूची सेवा करा व मनमत माऊलीच्या परमरशः ग्रंथ वाचनाने तुमची सर्वांची उन्नती व प्रगती होवो हीच वीरभद्र चरणी प्रार्थना असेही राय पाटणकर महास्वामीजी यांनी यावेळी सांगितले. सदर प्रसंगी श्री चे सेवेकरी शंकर स्वामी, बाळासो स्वामी, भारत पाटील व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

No comments