Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, १७ नोव्हेंबर, २०२४

दिपकआबांच्या विजयासाठी मुस्लिम समाजाचे सामूहिक नमाज पठण

 दिपकआबांच्या विजयासाठी मुस्लिम समाजाचे सामूहिक नमाज पठण 



सांगोला : तालुका प्रतिनिधी 


समाजातील दीन-दलित, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी अल्पसंख्यांक, वंचित उपेक्षित घटकाला न्याय देण्यासाठी गेल्या ३०-३५ महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यासारखा दमदार आमदार निवडून येण्याची गरज आहे. यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या विजयासाठी सांगोला शहरातील जामा मशिदीत मुस्लिम धर्मगुरूंसह मुस्लिम समाजाने सामूहिक नमाज पठण केले. 

      महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना मतदारसंघातील सर्वच समाजासह विविध संघटना, संस्थांचा पाठिंबा मिळत आहे. मतदारसंघातील हजारो तरुण दिपकआबांच्या विजयासाठी रात्रंदिवस प्रचार करून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. एकीकडे सर्व समाजातील लोक दिपकआबांच्या विजयासाठी प्रयत्न करीत असताना आता मुस्लिम समाजाने देखील दिपकआबांच्या विजयासाठी पुढाकार घेतला आहे. मतदारसंघातील हजारो मुस्लिम समाजातील युवक दीपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. शुक्रवारी सांगोला शहरातील जामा मशिदीत मुस्लिम धर्मगुरू हाजी शब्बीरभाई खतीब यांनी दिपकआबांच्या विजयासाठी नमाज पठण करून दुवा केली. यावेळी हाजी हमीदभाई खतीब, शकील मुजावर, मोहसीन खतीब, इम्रान काझी, महमूद पठाण यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते.


फोटो ;

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart