आई -वडील हेच आपले दैवत: सिने अभिनेता मा. खासदार गोविंदा
उद्याची निवडणूक उज्वल भवितव्य घडवणार: आम. शहाजीबापू पाटील
सांगोला/ प्रतिनिधी: प्रत्येकाच्या जीवनात संस्कार महत्त्वाचे आहेत. जीवनात आईची शक्ती ही प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श व प्रेरणास्थान आहेत .भारतीय भूमीत वारकरी, थोर समाज सुधारक , शूरवीर घडले. जीवनात आई वडील हेच आपले दैवत आहेत असे विचार व्यक्त करीत आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. आमदार शहाजीबापू पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन माजी खासदार व सिनेअभिनेता गोविंदा यांनी सांगोला येथे केले.
253 सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवसृष्टी येथे रविवार दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या रोडशो, रॅली व जाहीर सभेप्रसंगी सिनेअभिनेता गोविंदा बोलत होते.
यावेळी चेतनसिंह केदार सावंत ,खंडू सातपुते ,सुनीलनाना पवार ,विजय बनसोडे, नवनाथभाऊ पवार ,सचिन काटे, दीपक दिघे ,राहुल घोंगडे, दामोदर साठे, यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी शिवाजीअण्णा गायकवाड ,राजश्रीताई नागणे -पाटील, श्रीकांतदादा देशमुख,मुबीना मुलाणी,हरिभाऊ पाटील, वसंत सुपेकर, आनंद घोंगडे, समाधान सावंत, अरुण बिले, समीर पाटील, माऊली तेली, महादेव कांबळे, डॉ. मानस कमलापूरकर, अस्मिर तांबोळी ,डॉ.विजय बाबर, सुरज पाटील ,बाळासाहेब आसबे, सोमेश्वर यावलकर, काशिलिंग गाडेकर , सुजित भोकरे, काशिलिंग गावडे, अच्युत फुले,यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, एससी सेल, ओबीसी सेल, पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सिनेअभिनेता खासदार गोविंदा यांचा सत्कार आम. शहाजीबापू पाटील, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख राणीताई माने, शहरप्रमुख छायाताई मेटकरी ,सांगोला शहरसंघटक आनंदा भाऊ माने यांच्या हस्ते करण्यात आला.
पुढे बोलताना सिनेअभिनेता गोविंदा म्हणाले, सांगोल्याशी माझे जुने ऋणानुबंध आहेत .मी कोल्हापूरला जाताना सांगोला येथील ज्योतिर्लिंग येथे भोजन करून पुढे जायचो. शिवसेनेला जोडलेला हिरो म्हणजे गोविंदा अशी माझी खासियत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले आदर्श आहेत. यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांनी घेतले असून हे नेते भूतलावरचे तारे आहेत. यावेळी त्यांनी चित्रपटातील अनेक गीते गात सर्वांना खळखळून हसायला लावले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार शहाजीबापू पाटील हे विजयी होतील व त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील असा आशीर्वाद देत शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, महायुतीतील प्रमुख नेतेमंडळी ही खरी ताकद आहे. शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. माझ्यावरती तालुक्यातील जनतेचा शंभर टक्के विश्वास असून ही समोरची गर्दी याची पोहचपावती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांना न्याय देणारे मुख्यमंत्री आहेत .त्यांना पुन्हा ताकद देण्यासाठी व मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे . माझ्या आजारपणात ही निवडणूक होत असून प्रत्येकाने एक एक मत गोळा करून उद्याची निवडणूक जिंकायची आहे ही निवडणूक उज्वल भवितव्य घडवणारी आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत येणार असून मला आपण आमदार करा ! मुख्यमंत्री नामदार करतील असा विश्वास त्यांनी यावेळी जनसमुदायसमोर व्यक्त केला .
चौकट: 253 सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ अंबिकामातेचे दर्शन घेऊन माजी खासदार सिने अभिनेता गोविंदा यांनी केलेला रोडशो व छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवसृष्टी सांगोला येथील विराट जाहीर सभा उपस्थितांना शहाजीबापूंच्या विजयासाठी प्रेरणा देणारी आहे. यावेळी या सभेसाठी हजारोंच्या संख्येने मतदार बंधू -भगिनी उपस्थित होते. गोविंदा यांच्या भाषणाच्यावेळी मुस्लिम समाज बांधवांचा नमाज चालू असताना त्यांनी आपले भाषण थांबवून प्रार्थनेला, नामस्मरनाला प्राधान्य दिले नंतर भाषण सुरू ठेवले या ठिकाणी महाराष्ट्राच्या आदर्श संस्कृतीचे दर्शन घडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने मतदार बंधू -भगिनी, युवक वर्ग उपस्थित होता.
0 Comments