Ad Code

 

Ticker

6/recent/ticker-posts

नाझरे येथे वीरभद्र जयंती सोहळ्यात सुरुवात*

*नाझरे येथे वीरभद्र जयंती सोहळ्यात सुरुवात* 
*वीरशैव बांधवांनी ईस्टलिंग पूजा करणे गरजेचे...- राय पाटणकर महास्वामीजी*
नाझरे प्रतिनिधी 
       वीरशैव समाज बांधवांनी ईस्टलिंग पूजा करणे गरजेचे आहे म्हणजे त्यांना जीवनात सुख, शांती व समाधान लाभेल तसेच गुरुची कृपा होईल व ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा व निस्वार्थीपणे शिव शंकराची व वीरभद्राची सेवा करा व भक्तीचा अंकुर फुलवा असे श्री श्री श्री 108 108 श्री गुरु महादया रविशंकर शिवाचार्य महाराज राय पाटणकर यांनी वीरभद्र मंदिरात जयंती सोहळ्यात सांगितले. यावेळी महास्वामींचे प्रवीण पाटील व बसवेश्वर पाटणे या उभयंताच्या हस्ते सत्कार करण्यात आला व महाआरती करण्यात आली. 
       परम रहस्य ग्रंथात मनमत माऊलींनी शिवपार्वती संवाद सांगितला व यासाठी सर्वांनी ग्रंथाचे वाचन करा व संसार करीत असताना नम्रता ठेवा त्यामुळे भांडणे होणार नाही व सुख तुमच्याजवळ आहे परंतु तुम्ही चुकीच्या दिशेने वाटचाल केल्याने मिळत नाही. तसेच गुरु, लिंग व जंगमाची सेवा करा व भक्ती केल्याने जीवन तेजोमय होईल. भगवान शिवाने विश्व निर्माण केले व धर्माचे कार्य करणारे शिवासप्रिय आहेत मग ते आचार्य, शिवाचार्य, जंगम अगर तुम्ही शिवभक्त असो व यासाठी सर्वांनी धर्माचे आचरण करा असेही राय पाटणकर महास्वामिनी सांगितले.

Post a Comment

0 Comments