मुस्लिम समाज बांधवांचा दिपकआबांवर विश्वास, शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश
सांगोला ; तालुका प्रतिनिधी
गेल्या ३०-३५ वर्षांत लोकांची कामे करतांना दिपकआबांनी कधीच जात पात पाहिली नाही, सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळेच सांगोला विधानसभा मतदारसंघात दिपकआबांच्या कट्टर समर्थकांचे संघटन मजबूत झाले आहे. मोहसीन इलाई खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो मुस्लिम तरुणांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्वच समाजातील शेकडो तरुणांनी दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करण्याचा चंग बांधला आहे. गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, दीन दलित उपेक्षितांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिपकआबा १८-१८ तास काम करीत आहेत. दिपकआबांवर मुस्लिम समाज बांधवांचा विश्वास असल्याने शेकडो तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून शिवसेनेची मशाल हाती घेतली. मोहसीन इलाई खतीब, फिरोज मुल्ला, जैस मुजावर, निहाल खतीब, रफिक शेख, इमरान काझी, शोएब इनामदार, असिफ मुलाणी, आसिम मुलाणी, अस्लम मुलाणी, खुद्दार मुलाणी, रेहान शेख, बाळासाहेब राऊत या तरुणांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कमरूद्दीन खतीब, माजी सतीश सावंत, तुषार इंगळे उपस्थित होते.
0 Comments