Ad Code

 

Ticker

6/recent/ticker-posts

253 सांगोला विधानसभा मतदारसंघात डॉक्टर बाबासाहेब देशमुख विजयी.

 

              253 सांगोला विधानसभा मतदारसंघात डॉक्टर बाबासाहेब देशमुख विजयी.




  सांगोला/प्रतिनिधी:

      दिनांक 23/11/ 24 रोजी सांगोला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहात  पार पडली या मतमोजणी कामे 14 टेबल ठेवण्यात आले होते एका टेबलवर एक सुपरवायझर एक मायक्रोऑब्झर्व एक मतमोजणी सहाय्यक असे तीन कर्मचारी यांची टीम नेमण्यात आली होती. पोस्टल मतदानासाठी दहा टेबल ठेवण्यात आले होते त्यामध्ये एक सुपरवायझर एक मायक्रो ऑब्झर्वर व दोन मतमोजणी सहाय्यक नेमण्यात आले होते पोस्टल मतमोजणी करताना होम वोटिंग, सैनिक मतदान, आणि निवडणूक कर्तव्यावर असलेले कर्मचारी यांचे एकूण 2666 मतदान झाले आहे एकूण झालेले मतदान 263679  झालेले मतदान आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सर्वात जास्त मतदान म्हणजेच एक 116256 झालेले असून ते विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी यांनी घोषित केले आहे त्या खालोखाल अॅड. शहाजी पाटील यांना 90870 मते पडले असून त्यांनी द्वितीय क्रमांकाची मते  पडलेले आहेत आणि तृतीय क्रमांक वर 50962 मतांनी दीपक आबा  साळुंखे पाटील आहेत या  कामी संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेमध्ये मतमोजणी निरीक्षक म्हणून अभिषेक गहलोत  उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे तहसीलदार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुधीर गवळी मुख्याधिकारी नगरपालिका सांगोला  यांचे सोबत सुमारे 100 अधिकारी व कर्मचारी आज मतमोजणी कामासाठी उपस्थित होते. तसेच मतमोजणी कक्षामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला होता. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी  विक्रांत गायकवाड, तालुका पोलीस अधिकारी, भीमराव खंदाळे जे.डी. मेहरसिंग इन्स्पेक्टर ITBP उपस्थित असल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले


Post a Comment

0 Comments