Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

ग्रामीण भागातील पत्रकाराना सहकार्य करू: आ.दिपकआबा साळुंखे पाटील .

ग्रामीण भागातील पत्रकाराना सहकार्य करू: आ.दिपकआबा साळुंखे पाटील .

(ग्रामीण पत्रकार संघटनेचा आ. दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न) 
सांगोला प्रतिनिधी :
        महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संचलित सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नुकत्याच निवडी संपन्न झाल्या. यामध्ये अध्यक्ष रविराज शेटे,  सचिव दत्तात्रय पवार, सदस्य अतुल फसाले  यांचा आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते त्यांच्या सांगोल येथील कार्यालयात सत्कार करण्यात आला. 
        ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेतील सर्व पत्रकारानी अग्रेसर राहावे पत्रकार सत्कार समारंभ प्रसंगी दिपक आबा बोलत होते यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेला सहकार्य करण्याचे आश्वासन देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  
.सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, महिला शक्ती ग्रुपच्या अध्यक्षा जयश्री सावंत, सौ उज्वला बोराटे व त्यांचे सहकारी तसेच अनिलनाना खटकाळे,आनंदा फाटे आबांचे सहकारी व कार्यकर्ते या वेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

No comments