नाझरे प्रतिनिधी
जि.प. शिक्षण विभाग सांगली, पंचायत समिती आटपाडी व सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आटपाडी तालुक्यातील तंबाखू मुक्त शाळांचा मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते जि.प. सांगली येथे गुणगौरव करण्यात आला.
तंबाखूमुक्त एक पायलट प्रोजेक्ट कमी वेळेत करून याबाबत जनजागृती करून आटपाडी तंबाखू मुक्त शाळा केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले. यावेळी सध्या तरुणांमध्ये नशा चे प्रमाण वाढत असून सलाम मुंबई फाउंडेशन यांनी या उपक्रमा बरोबर नशा मुक्त भारत उपक्रम राबवावा असा मौलिक सल्लाही धोडमिसे मॅडम यांनी यावेळी दिला. गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले असे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी यावेळी सांगितले. तसेच नोडल अधिकारी प्रशांत चंदनशिवे यांचे विशेष योगदान असल्याचे सांगितले.
सदर प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी राज साहेब लोंढे, जिल्हा शैल्य चिकित्सक अभिमान पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, योजना शिक्षण अधिकारी महेश धोत्रे, मुंबई फाउंडेशनच्या जनरल मॅनेजर कल्पना पिल्ल ई, उपशिक्षणाधिकारी शोभा धुमाळ, ज्योती राजमाने, मुख्याध्यापक जितेंद्र माने, प्रकाश भुते, जिल्हा समन्वयक रवींद्र कांबळे, नोडल अधिकारी प्रशांत चंदनशिवे, गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ कोळपे, दत्तात्रय मोरे, सारिका कदम, निवृत्ती करपे, मलेश तांदळे, इ. गुणगौरव करण्यात आला. सूत्रसंचालन रवींद्र कांबळे व प्रशांत चंदनशिवे तर आभार जिल्हा नोडल अधिकारी रामचंद्र टोणे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा