नाझरे प्रतिनिधी
मानगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा नाझरे ता. सांगोला येथील रहिवाशी दादासो वाघमोडे यांची शिवसेनेच्या सांगोला तालुका उपप्रमुख पदी व चिनके विकास सेवा सोसायटीचे चेअरमन तथा चिनके ता. सांगोला येथील रहिवासी पांडुरंग मिसाळ यांची सोलापूर जिल्ह्याच्या उपजिल्हा संघटक पदी निवड झाली आहे. सदर निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांची विचारधारा जोपासून, सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्ष सांगोला तालुक्यात व जिल्ह्यात वाढीसाठी आपण प्रयत्न करणार असून, सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन शिवसेनेचे विचार सर्वसामान्य पर्यंत पोहोचविण्याचे काम निष्ठेने करू असे निवडीनंतर दादासो वाघमोडे व पांडुरंग मिसाळ यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा