Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

.गावकरी तिथे राव काय करी "याची वाटंबरे कराना महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून आली प्रचिती

 वाटंबरे महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी विजय पवार व उपाध्यक्षपदी द्रोपदी भगत व सचिन फडतरे  यांची निवड.



("गावकरी तिथे राव काय करी "याची  वाटंबरे कराना महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून आली प्रचिती )


वाटंबरे/प्रतिनिधी:

सांगोला तालुक्यातील वाटंबरे  येथील ग्रामपंचायतीची शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. 

या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा केली गेली या चर्चेनंतर महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची ची निवड करण्यात आली या वेळी एकमताने विजय पांडुरंग पवार  यांची महात्मा गांधी तंटामुक्त  समितीच्या अध्यक्ष पदी  व  द्रोपदी भगत व सचिन फडतरे  यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.  




चौकट:

[

माजी गृह मंत्री स्व. आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट २००७ साली महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे राबविण्यात आले या अभियानाचा मुख्य हेतू गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करत गावातील लहान मोठे तंटे गावातच सोडवून पोलिसांवरील ताण कमी व्हावा  अशी शासनाची योजना होती. 

वाटंबरे गावाने या पंचवार्षिक मध्ये ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिली तसेच सोसायटीची निवडणुकही बिनविरोध केली आज झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी दहाजणांचे अर्ज आले होते  व उपाध्यक्ष  या पदासाठी दोन अर्ज आले होते वाटंबरे गावाने या पंचवार्षिक मध्ये ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिली तसेच सोसायटीची निवडणुकही बिनविरोध केली गावाने बिनविरोधाची परंपरा जपण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळींनी दहा उमेदवारानी त्यांच्यामधील एक उमेदवार अध्यक्ष म्हणून निवड करावी असे सांगितले गेले परंतु त्यांच्यामध्ये एकमत न झाल्याने ग्रामस्थांनी  दहा उमेदवार सोडून नागरीका मधुन  विजय पवार यांना अध्यक्ष पद दिले तसेच त्या दहाही उमेदवारांनी ते स्वीकारले व उपाध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आल्याने त्या दोन्ही उमेदवारांना उपाध्यक्ष पद देत वाटंबरे गावांने  बिनविरोधाची परंपरा जपत दुसऱ्या गावासमोर एक आदर्श निर्माण करुण दिला .]



               यावेळी कार्यकाळ संपलेले माजी तंटामुक्त अध्यक्ष  अनिल पवार यांचा सत्कार ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला तसेच नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार ग्रामपंचायत वतीने करण्यात आला  .

या वेळी सरपंच नामदेव पवार, उपसरपंच मोनिका निकम ग्रामसेवक शंकर मेटकरी ,तलाठी शिंदे, पोलीस पाटील पांडुरंग पवार, तसेच सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सोसायटी चेअरमन,जिल्हा परिषद प्राथमिकचे  सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, महावितरणचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व वाटंबरे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने ग्रामसभेला उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart