Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

आयडियल जनरलिस्ट असोसिएशन पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी, दैनिक वृत्तपत्र सेवाशक्ती चे पत्रकार कांता (भाऊ ) राठोड यांची निवड.

आयडियल जनरलिस्ट असोसिएशन पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी, दैनिक वृत्तपत्र सेवाशक्ती चे पत्रकार कांता (भाऊ ) राठोड यांची निवड.

शुक्रवार दि.23 ऑगस्ट रोजी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते व बाळकडू , सेवाशक्ती दैनिक वृत्तपत्राचे पत्रकार कांता (भाऊ) राठोड यांची आयडियल जनरलिस्ट असोसिएशन संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद वाचस्पती सर याच्या आदेशाने महाराष्ट्र गोवा गुजरात अध्यक्ष बाळासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
इंडियन आयडियल जनरलिस्ट असोसिएशन संघ पत्रकार क्षेत्रामध्ये गेली 23 वर्षे कार्यरत आहे व पत्रकारांच्या समस्या, त्यांच्या कुटुंबाच्या समस्या सोडवण्यासाठी वारंवार पुढे येत असते. पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना बस, रेल्वे प्रवास मोफत मिळवून देण्यासाठी, मानधन मिळवून देण्यासाठी संघटना वारंवार प्रशासनाकडे, सरकारकडे निवेदन देऊन व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते. 
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो टिकला तरच लोकशाही टिकेल बातम्या घेण्यासाठी पत्रकाराना वारंवार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते, प्रवास करावे लागते यासाठी बस ,रेल्वे, प्रवास मोफत मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा चालू आहे .
सामाजिक कार्यकर्ते व समाज कार्यामध्ये अग्रेसर असणारे कांता (भाऊ (राठोड हे झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग संघटक- सचिव महाराष्ट्र प्रदेश ,तथागत ग्रुप सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र प्रदेश महासचिव, युवा ग्रामीण पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख, बाळकडू , सेवाशक्ती दैनिक वृत्तपत्र पत्रकार तसेच विविध क्षेत्रात संस्थेवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांचे समाजकार्य पाहून त्यांची ही निवड करण्यात आलेली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart