शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शेकापच्या मेळाव्यात पाण्यावरती एक ही प्रश्न मांडला नाही : विजय बाबर
५० वर्षापासून सांगोला तालुक्यात पाण्यावरती आंदोलने आणि मेळावे घेतले जात होते. परंतु सांगोला तालुक्याच्या इतिहासात पहिलाच शेतकरी मेळावा असा झाला की त्यामध्ये पाण्यावरती एक ब्र शब्द काढला नाही. कारण खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यातील इंच ना इंच जमीन बागायत होण्यासाठी शासनाकडून कायदा तयार करून घेतला त्यामुळे, शेतकरी मेळाव्यात पाण्यावरती भाषण झालं नाही याच श्रेय शहाजीबापू पाटील आणि, रणजीतसिंह निंबाळकर यांना जात असे भारतीय जनता पार्टी युवा नेते डॉ. विजय बाबर यांनी सांगितले.या उलट पाण्याचा कायदा तयार
झाल्यानंतर गावोगाव शेतक-यांनी आनंदोत्सव साजरा केला या शेतकऱ्यांच्या भावनेची थट्टा शेतकरी मेळाव्यात करण्यात आली.
यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. जुने जाणती लोक सोबत घेऊन नवीन नेतृत्वाने कार्यक्रम घ्यायचे असतात हा तर पोरकटपणाचा खेळ झाला आहे. मेळाव्यात भाषणादरम्यान नेतेमंडळींनी शेती विषयी काही मागण्या शेकाप नेते मा. आम. जयंत पाटील यांच्या कडे केल्या त्या मागण्या मा. पाटील यांनी विधानसभेत कृषिमंत्र्यांकडे करणार आणि मग त्या सांगोल्याला मिळणार या पेक्षा कृषिमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांचे मित्र आहेत हे सर्व तालुक्याला माहिती आहे. असेही आमच्या प्रतिनिधीशी बोलताना युवा नेते डॉ. विजय बाबर यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा