सांगोला येथे आम सभा संपन्न.
सांगोल्यात जलजीवन कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार, मराठा कुणबी आरक्षण, अवैद्य वाळू उपसा, निकृष्ट रस्ते अशा विविध विषयांवर सांगोल्यातील आमसभेमध्ये पाच तास वादळी चर्चा झाली. महसूल, पोलीस, नगरपालिका, पाणीपुरवठा अशा विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार केला.
आमदार शहाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवार (ता. 14) रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, बाबुराव गायकवाड, डॉ. बाबासाहेब देशमुख, खंडू सातपुते, तानाजी पाटील, दादासाहेब लवटे, गुंडा खटकाळे, सूरज बनसोडे, अभिषेक कांबळे, संतोष देवकते, संजय देशमुख, शहाजीराव नलवडे, अरविंद केदार, अशोक शिंदे, आनंद माने, संभाजी आलदर, आमसभा संपन्न झाली या आमसभेसाठी मंगळवेढा सांगोल्याचे प्रांताधिकारी आर. बी. माळी, समाधान घुटूकडे, तहसीलदार संतोष कणसे, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे इत्यादी अधिकाऱ्यांसह तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आमसभेच्या वेळी तानाजी बाबर, उत्तम बाबर, विनोद बाबर, अरविंद केदार, सतीश रेवे, अरविंद केदार, अशोक गावडे, एकनाथ शेंबडे, शरयू कोळेकर, नामदेव लवटे, संतोष देवकते, बाळासो काटकर, अभिषेक कांबळे, बाळासाहेब वाळके, दादासो लवटे, बाबुराव गायकवाड इत्यादींनी समस्या मांडल्या.
गलथान केले असेल तर सोडणार नाही : आमदार शहाजी पाटील
जिथं..जिथं गलथानपणा दिसून आला तिथं..तिथं..अधिकारी असो किंवा ठेकेदार असो एकालाही सोडणार नाही. जनतेच्या सहकार्याशिवाय तालुक्याचा विकास होत नाही. पाण्याची पातळी खालावल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाई काळात कोणत्याही गावाला पाण्याची अडचण येणार नाही, तलाठी, ग्रामसेवकांना नेमणूकीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक करावे. संपूर्ण तालुक्यातील वाळू एकदाच बंद करून टाका. अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांची दखल घ्यावी. जिथे आवश्यकता असेल तर टँकर द्यावेत. अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना पाठीशी घालू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. खोटं बोलणाऱ्या आणि कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही इशारा आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला.
आमसभेसाठी विभाग प्रमुख उपस्थित नसल्याने माजी आमदार यांची नाराजी –
सांगोला तालुक्याला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला असल्याने अधिकाऱ्यांनी कामांची क्वालिटी जपण्याचे काम करावे. तलाठी, ग्रामसेवकांनी गावात थांबून जनतेच्या कामांना प्राधान्य द्यावे. माणसाबरोबर जनावरांना देखील पाणी देण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे. भूमी अभिलेख विभागात सावळा गोंधळ आहे. दुष्काळातील आमसभेसाठी विभाग प्रमुख उपस्थित राहत नसल्याने आमदार माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा