घरकुल योजनेच्या अनुदानाचा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थ्यांवर आंदोलनाची वेळ.
सांगोला / प्रतिनिधी :
राजुरी तालुका सांगोला येथील रहिवासी धोंडी आप्पा जगन्नाथ काटे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा शेवटचा हप्ता मिळण्यासाठी राजुरी ग्रामपंचायत कडून टाळाटाळ होत असल्याने या लाभार्थ्याने ९ मार्च २०२४ पर्यंत अनुदानाचा हप्ता न मिळाल्यास पंचायत समिती कार्यालय समोर उपोषण करणार असल्याचे सांगितले. राजुरी येथील धोंडी आप्पा जगन्नाथ काटे यांना सन २०१६-१७ ला प्रधानमंत्रीआवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाचे काम १ मार्च २०१९ रोजी सर्व अटीनुसार पूर्ण झाले असून त्याचा पहिला हप्ता ६० हजार रुपये व दुसरा हप्ता ३०,००० रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे परंतु शेवटचा
३०,००० रुपयाचा हप्ता मिळण्यासाठी या लाभार्थी यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे वेळोवेळी लेखी अर्ज व तोंडी मागणी करूनही ग्रामपंचायतकडून टाळाटाळ केली जात असल्याने धोंडी आप्पा जगन्नाथ काटे यांनीदिनांक ९ मार्च २०२४ पर्यंत घरकुल
अनुदानाचा हप्ता न मिळाल्यास ११ मार्च २०२४ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करणार असलेचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

No comments