उत्कर्ष माध्यमिक विद्यालय सांगोला यांची यशराज गांडूळ खत प्रकल्पाला भेट.
उत्कर्ष माध्यमिक विद्यालय सांगोला यांची यशराज गांडूळ खत प्रकल्पाला भेट.
उत्कर्ष माध्यमिक विद्यालय सांगोला
IBT विभागामार्फत ९ विद्यार्थ्यांनी वाटंबरे येथील अल्पावधीत शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या यशराज गांडूळ खत प्रकल्पाला भेट दिली. यावेळी यशराज गांडूळ खत प्रकल्पाचे मालक सुरेश पवार यांनी आलेल्या विद्यार्थ्यांना गांडूळ खता विषयी मार्गदर्शन करताना गांडूळ खत तयार करण्यापासून त्यांचा वापर, उत्पादन, बेड लावणे, वर्मी वॉश तयार करणे तसेच शेतीसाठी त्याचा उपयोग याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली .
यावेळी प्रशालेतील IBT विभागातील शिक्षक सुशांत सुभाष गावडे, सत्यवान चंद्रकांत भिंगार्डे , मंगेश विवेकानंद कुलकर्णी , शिक्षीका माधुरी आनंद गोरे उपस्थित होते.

No comments