Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

मराठा आरक्षण पायी दिंडीचे वाटंबरे येथे जल्लोषात स्वागत.

 मराठा आरक्षण पायी दिंडीचे वाटंबरे येथे जल्लोषात स्वागत.



वाटंबरे /प्रतिनिधी : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याच्या समर्थनार्थ पाचेगाव खुर्द  ते पंढरपूर भव्य मराठा आरक्षण पायी दिंडीचे शुक्रवार दि. ८ डिसेंबर रोजी पाचेगाव खुर्द येथील मराठा समाजाच्या वतीने आयोजन केले गेले होते .

या दिंडीचे वाटंबरे येथे आगमन होताच वाटंबरे येथील मराठा समाजाच्या वतीने मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.  यावेळी वाटंबरे गावातील महिलांनी या दिंडीचे औक्षण करून स्वागत केले  गावचे प्रथम नागरिक सरपंच किरण पवार यांच्या हस्ते   दिंडीचे स्वागत करण्यात आले .या स्वागतासाठी या वेळी वाटंबरे गावातील मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातील महिला, तरुण वर्ग, तसेच शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी दिंडीच्या हस्ते  गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच गावचे जागृत देवस्थान खंडोबा या ठिकाणी दिंडीच्या जेवणाचे आयोजन केले गेले होते .



चौकट:

{मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याच्या समर्थनार्थ पाचेगाव खुर्द ते पंढरपूर अशा भव्य मराठा आरक्षण पायी दिंडीचे नियोजन केले गेले आहे. ही दिंडी शुक्रवार दि. ८ डिसेंबर रोजी पाचेगाव खुर्द येथुन  

सकाळी ७ वाजता प्रस्थान करणार आहे ,सकाळचा नाष्टा हॉटेल चांदणी मैदान, दुपारचे जेवण वाटंबरे खंडोबा देवस्थान, दु.४ वाजता. तहसिलदार सांगोला यांना निवेदन, सायं. ५ वाजता, चहापान ,रात्रीचा मुक्काम मेथवडे फाटा

दुसरा दिवसी सकाळी ७ वाजता प्रस्थान

 सकाळी ८ वा. संगेवाडी येथे नाष्टा

सकाळी १० वा. खर्डी सिताराम महाराज यांचे दर्शन ,दु.१ वा. पंढरपूर येथील फॉरेस्ट येथे जेवण, सायं. ४ वा. पंढरपूर श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मराठा आरक्षणासाठी श्री पांडुरंगाला साकडे घातले जाणार आहे अशी माहिती दिंडी आयोजकाकडून सांगण्यात आली.}




जाहिरात :













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart