Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक बनण्यासाठी झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य )यांचा उपोषणाला जाहीर पाठिंबा.

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक बनण्यासाठी झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य )यांचा उपोषणाला जाहीर पाठिंबा.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव व बापूसाहेब भुजबळ यांच्या उपस्थित भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक बनण्यासाठी एक दिवसीय लक्षणीय आंदोलन व उपोषण झाले.
एक जानेवारी 1848 या दिवशी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेची म्हणजेच पुण्यातील भिडे वाड्याची दैनंदिनियम अवस्था झालेली आहे या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक आहे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून अनेक संघटनांची मागणी आहे त्या संदर्भात जागा मालक आणि राज्य सरकार यांच्या न्यायालयीन लढा चालू आहे तरी सदर प्रकरणांमध्ये सरकारच्या बाजूने कोणतीही सकारात्मक प्रक्रिया करताना दिसत नसल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या उपस्थितीमध्ये अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने ओबीसी वेल्फेअर फाउंडेशन, ओबीसी जन मोर्चा ,युवा माळी संघ,  झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य) व आनंदी प्रतिष्ठान, यंग पृथ्वी फाउंडेशन व इतर अनेक संघटना एक दिवसीय लक्षणीय उपोषण केले.
 त्यामध्ये समता परिषदेच्या मंजिरी ताई धाडगे ,सपनाताई माळी शिवणकर ,गौरीताई पिंगळे बनकर, सुनिता भगत, ऑड.विद्याताई शिंदे भुजबळ ,ऑड. मंगेश ससाणे, मृणाल डोले पाटील, किरण बेनकर ,अक्षय पिंगळे, संध्या बेनकर यांचे सहकार्य लाभले.
यादरम्यान नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन चालू असल्याने आदरणीय छगन भुजबळ साहेब यांनी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सुचनेद्वारे बाबा आढाव यांच्या उपस्थितीमध्ये भिडे वाड्याच्या सुरू असलेल्या उपोषणाचा मुद्दा मांडला त्यावर सविस्तर अर्धा तास चर्चा झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब यांनी आश्वासन दिले बाबा आढाव यांच्या वयाचा आदर करत व उपोषण करते यांच्या मागणीचा आदर करून सदरचे उपोषण स्थगित करावे व येत्या 26 जानेवारी पर्यंत सदरच्या स्मारकाचे काम सुरू होण्यासंदर्भात आम्ही नक्कीच सकारात्मक पावले उचलून. त्यामुळे बाबा आढाव यांच्या आदेशानुसार 26 जानेवारी पर्यंत उपोषण स्थगित केले या उपोषणास प्रमुख मान्यवर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, कांबळे अण्णा गायकवाड, मधुकर राऊत, शारदाताई लडकत, आनंदा कुदळे, विशाल जाधव, झेप फाउंडेशनचे संस्थापक /अध्यक्ष कांता (भाऊ )राठोड ,नितीन भगत, नितीन बोराटे ,विजय बोडे ,युसुफ बागवान, अक्षय गोठावळे, प्रितेश गवळी, शिवराम जांभुळकर ,प्रदीप हुमे,सुधीर पैठवणकर, विठ्ठल सातव, विजय भुजबळ, सुप्रिया सोलांकुरे, शारदा वाडेकर, व इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .
अनेक संघटनानीसहभाग दिला होता त्यांचे उपोषणकर्त्यांनी आभार मानले.

No comments