सेंद्रिय शेती सुखी समृध्द जीवन :
सेंद्रिय शेती सुखी समृद्ध जीवन :
: सुरेश पवार
यशराज गांडूळ खत प्रकल्प, वाटंबरे
ता सांगोला, जि सोलापूर.
मो. ८२०८२२९०४०
जगभरातील राष्ट्रांमध्ये आजमितीला सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या फळभाज्या यांना मोठी मागणी वाढत आहे. कारण ही तसेच आहे आज संपूर्ण जगामध्ये शेतीसाठी वापरल्या गेलेल्या रसायानामुळे मानवी जीवन धोक्याची पातळी ओलांडत आहे. कर्करोग, मधुमेह, बीपी, थायरॉईड यासारखे असंख्य आजार तरुण वर्गामध्ये होत आहेत. याला संपूर्णता आपणच जबाबदार आहोत.
अन्नधान्य पिकवण्याच्या स्पर्धेमध्ये आपण शेतामध्ये खूपच प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करत आहोत, रासायनिक सुपीकता, भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र सुपीकता बदलते व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो.
म्हणूनच सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर शेतीत केला गेला पाहिजे गांडूळखत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ठ व सहज उपलब्ध होणारे प्रभावी खत आहे. यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.
देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पीक घेणे तसेच त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढवणे अनिवार्य आहे, परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर व मानवी जीवनावर दिसून येत आहे, दिवसेंदिवस जमिनीचा सुपीकता कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्म जीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेत जमिनीचे भौतिक रासायनिक व जैविक दृष्ट्या अपरीमीत हानी झाली आहे.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असून अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. वर्षानुवर्षे एकाच जमिनीत एकच पिकांची वारंवार लागवड केली जाते त्यामुळे जमिनीत जस्त मि.ग्रॅ./ कि. ८२१०७ पाण्याचा वापर वाढला आहे दिवसेंदिवस शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी बनली आहे.
ह्यासाठी गांडूळ खत काळाची गरज बनले आहे. गांडूळ खत म्हणजे काय ?
गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीरात आवश्यक भाग घेऊन उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो त्यालाच गांडूळ खत किंवा व्हर्मोों कंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला २४ तासाचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीराला दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा ९० टक्के भाग शहरातून बाहेर टाकतो. गांडूळ खत वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे अन्नद्रव्य, संप्रेरके उपयुक्त जिवाणू पासून वनस्पतीची रोगप्रतिकारक्षमता वाढते, गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्य संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रिय खत असून जमिनीची जैविक गुणधर्म वाढल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून निरोगी पीक वाढीस मदत होते. गांडूळखत हा सेंद्रिय शेतीतील पीकवाढीस महत्त्वाचा घटक आहे.
गांडूळाचे प्रकार:-
गांडूळाचे एपिजिक,नेसिक, आणि एंडोजिक असे तीन प्रकार असून या तीनही प्रकारांची वैशिष्ट्ये व गुणधर्म पाहता एपिजिक आणि नेसिक या प्रकारातील गांडूळ खत निर्मितीसाठी वापरली जातात त्या आईसेनिया फेटिंडा, पेरीओनिक्स युड्रिल्स व लॅम्पिटो या चार प्रजाती अधिक उपयुक्त आहेत, ते स्वतःच्या वजनाइतके आणि रोज खातात. या जातीची वाढ चांगली होऊन खत तयार करण्याची प्रक्रिया ४० ते ४५ दिवसात होते.
गांडूळ जीवणक्रम:-
गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी बाल्यावस्था आणि पूर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थेसाठी ओलसर जमीन आवश्यक असते गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरुष असे दोन्हीही अवयव असतात. गांडूळ प्रत्येक सहा व सात दिवसात अंडी टाकते या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात अंडी अवस्था हवामानाच्या अनुकुवतेनुसार सात ते २० दिवसाची असते. गांडुळाची पूर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते पूर्णावस्थेत आलेल्या गांडुळाचा तोंडाकडील भाग दोन ते तीन सेंटिमीटर अंतरावरील अर्धा सेमी आकाराचा भाग जाड होतो हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडूळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. एसिनिया फेटिडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सेमी असते एका किलो मध्ये पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडूळे बसतात अशी एक हजार गांडूळे घेवून त्यांची अनुकूल वातावरणात वाढ केल्यास त्यांची संख्या ८,८३,००० एवढी होते १०० किलो गांडूळ एक महिन्याला एक टन गांडूळ खत तयार करतात.
गांडूळ खत करण्याची पद्धती:-
गांडूळ खत तयार करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत परंतु कृत्रिम पद्धतीने तयार केलेले पॉलिथिन पेपरचे ब्रँड सहज आणि वाजवी किमतीत उपलब्ध होत असल्यामुळे ते वापरण्यावर लोकांचा अधिक भर आहे. ह्या बेडची लांबी १२x४x२ फूट असते बेड लावण्याच्या जागेवरती सूर्यप्रकाश व पावसापासून संरक्षण करण्यासाठी छप्पर आवश्यक आहे.
चौकट -
गांडूळ खतातील अन्नद्रव्ये
अन्नद्रव्य गांडूळ खत
नत्र टक्के ०.८१.६ --
स्फुरद टक्के ०.५३ ०.८०
पालाश टक्के १.३२.३
कर्ब नत्र प्रमाण १८.१-२६.१
तांबे मि.ग्रॅ./ कि. १२-२१
लोह मि.ग्रॅ./कि. ३८९६-७३४७
मँगेनीज मि.ग्रॅ./ कि. ११०-१७२






No comments