स्व. आ. गणपतरावजी देशमुख सूतगिरणी येथे रस्ता सुरक्षा अभियान संपन्न.
स्व. आ. गणपतरावजी देशमुख सूतगिरणी येथे रस्ता सुरक्षा अभियान संपन्न.
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुका येथील स्व. आमदार गणपतरावजी देशमुख सुतगिरण येथे मंगळवार दि ७ जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कार्यक्रम आयोजित केला गेला होता यावेळी एपीआय मनोज बाबर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रस्ता सुरक्षा विषयी माहिती दीली या वेळी त्यांनी मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करावा , फोर व्हीलर गाडी चालवताना सीट बेल्टचा वापर करावा ,मद्य प्राशन करून वाहन चालवु नये, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळावे, विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये , वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे याची माहिती दिली. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या कामगारांना रिफ्लेक्टर व वाहतुकीच्या नियमाचे परिपत्रक देण्यात आले.
या कार्यक्रमाला सूतगिरणीचे चेअरमन प्रभाकर माळी, उप चेअरमन गव्हाणे, वेल्फेअर अधिकारी वाघमोडे, पोलिस अंमलदार सावंत, बोरकर, कांबळे ,नवले ,भगत तसेच राष्ट्रीय महामार्गाचे मॅनेजर शर्मा, गौरव सिंग व सर्व स्टाफ तसेच सूतगिरणी मधील सर्व महिला व पुरुष कर्मचारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments