श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल वाटंबरे प्रशालेत किशोरी मेळावा संपन्न.
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल वाटंबरे प्रशालेत किशोरी मेळावा संपन्न.
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुका वाटंबरे येथे दि. १८ जानेवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्यू कॉलेज या प्रशालेत किशोरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सांगोला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य संवादक निकीता पवार यांनी 'मुलींचे मानसिक आरोग्य' या विषयावर प्रशालेतील मुलींशी मुक्त संवाद साधला.
सातवी ते बारावी पर्यंतच्या मुली या किशोरी- मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. मुलींचे शारीरिक वे मानसिक आरोग्य, किशोर वयात येणाऱ्या समस्या अशा विषयांवर योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. सर्वप्रथम प्रशालेच्या मुख्याध्यापिका निता पवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून मुलींच्या किशोर वयातील समस्या व उपाययोजना, या वयात घ्यावयाची दक्षता, सुरक्षिते बाबत आपले मत मांडले. त्यानंतर प्रशालेच्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका मिनाक्षी पवार यांनी किशोर वयात होणारे शारीरिक बदल, या नैसर्गिक बदलाला सामोरे जाताना- घ्यावयाची दक्षता याबाबत विद्यार्थिनींशी मुक्त संवाद साधला व मासिक पाळी व या दिवसांत घ्यावयाची काळजी याची माहिती दिली. आरोग्य संवादक निकीता पवार यांनी मानसिक आरोग्याची अकरा लक्षणे याविषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मानसिक आरोग्याचा कानमंत्र दिला मुलींनी विचारलेल्या शंका समस्येचे निरासरन केले .

No comments