बलवडी येथील श्री शनी मंदिर मध्ये श्री हनुमानाची प्रतिष्ठापना*
*बलवडी येथील श्री शनी मंदिर मध्ये श्री हनुमानाची प्रतिष्ठापना*
नाझरे प्रतिनिधी
बलवडी ता सांगोला येथील शनी मंदिर मध्ये श्री हनुमानाची प्रतिष्ठापना बाळासो ऐवळे व सौ. सुशीला ऐवळे या उभयंताच्या हस्ते विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
श्रीराम, जयराम, जय जय राम, रामाचा भक्त श्री हनुमान या जयघोषात बलवडी गावातून मूर्तीची मिरवणूक भजनी दिंडी सह काढण्यात आली. यावेळी पुरोहित म्हणून लिंग या स्वामी, पंकज दंडवते यांनी काम पाहिले. यावेळी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक दत्तात्रय कारंडे, प्रार्थमिक शिक्षक दत्तात्रय कारंडे, सुरेश बुवा महाराज, सोमनाथ कारंडे, बालेश ऐवळे, दत्तात्रय ऐवळे, मंदा जावीर, हनुमान भक्त हजर होते.

No comments