भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार - सावंत यांनी गाव चलो अभियानतर्गत कुर्डुवाडी येथील नागरिकांबरोबर साधला संवाद.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पि. नड्डाजी यांच्या सूचनेनुसार आयोजित केलेल्या "गाव चलो अभियान" अंतर्गत जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार - सावंत यांनी कुर्डुवाडी ता.माढा येथील नागरिकांबरोबर संवाद साधला.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनाची माहिती पत्रकाद्वारे सर्व सामान्य नागरिकांना पोचविल्या.
यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधताना आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रत्येक बूथवर ५१% टक्के मते मिळविण्याचा निर्धार केला.
यावेळी प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी बूथ प्रमुख व भाजप कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




No comments